vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर बैठकीत सविस्तर चर्चा  धर्मनिरपेक्षता व शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा महत्त्वाचा : अरविंद चव्हाण 

राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर बैठकीत सविस्तर चर्चा  धर्मनिरपेक्षता व शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा महत्त्वाचा : अरविंद चव्हाण

जालना (प्रतिनिधी) : जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पक्षाकडून सुशिक्षित व सामाजिक भान असणाऱ्या आणि सेवाभावी वृत्तीच्या कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी प्रदान करण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या उमेदवारी अर्जावर आज सोमवार रोजी जिल्हा पक्षकार्यालय येथे महत्त्वाची बैठकीत चर्चा करण्यात आली. जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवार रोजी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पक्षातील इच्छुक उमेदवाराच्या उमेदवारी अर्जावर महत्त्वाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पक्षाचे उपाध्यक्ष तथा समन्वयक मधुकरराव अर्दड यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी जालना शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद यांनी जालना महानगरपालिका निवडणूक संदर्भात सविस्तर माहिती देऊन पुढील नियोजनाबद्दल अहवाल प्रस्तावित केला. बैठकीच्या अध्यक्षीय स्थानवरून श्री चव्हाण यांनी बोलताना सांगितले की पक्षातील सक्रिय कार्यकर्ते व निवडून येण्याची क्षमता आणि सेवाभावी वृत्तीच्या या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करून सर्व जाती धर्माच्या घटकांना संधी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात येईल .कार्यकर्त्यांनी आतापासूनच पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सजग राहावे असे आवाहन श्री चव्हाण यांनी केले. शहराच्या सर्वांगीण विकास स्वच्छ व सुंदर जालना आणि नागरी सुविधांची तत्परता आणि प्रशासनातील आनियमिता दूर करण्यासाठीचा प्रयत्न पक्षाचा राहिल असे श्री चव्हाण यांनी सांगितले.

प्रदेश उपाध्यक्ष मधुकरराव आर्दड यांनी शहराच्या महत्त्वपूर्ण विषयावर बोलताना शहराचा विकास आराखडा तयार करताना शिक्षण आरोग्य क्रीडा आणि नागरी सुविधा बरोबरच विविध वास्तूंची निर्मिती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी उपाययोजना आणि शहरातील झोपडपट्टी भागाच्या सर्वांगीण विकास आदी गोष्टीचा प्राधान्य विचार करण्यात येईल असे सांगून भविष्यातील शहराच्या वाढत्या लोकसंख्ये नुसार नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे विशेष प्रस्ताव पाठविणे गरजेचे असल्याचे श्री अर्दड यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महानगरपालिका निवडणूक शिवशाहू, फुले, आंबेडकर, मौलाना आझाद व अण्णाभाऊ साठे यांचे विचार शहराच्या सर्वांगीण विकास आदि मुद्दे घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार असून यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाह आलम खान, शहरजिल्हा कार्याध्यक्ष मिर्झा अन्वर बेग, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चितेकर, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर घेवंदे आदि उपस्थित होते

संबंधित पोस्ट

अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा यांनी गढवाल रायफल्स रेजिमेंटचे कर्नल म्हणून पदभार स्वीकारला

एमपीएससीकडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

छत्रपती संभाजीनगर येथे 7 सप्टेंबरला डाक अदालत डाक सेवेसंदर्भातील तक्रारी 4 सप्टेंबरपूर्वी पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हलाल सर्टिफिकेश संदर्भात कठोर नियम आवश्यक : सर्टिफिकेशन केवळ मांसाहारी खाद्य पदार्थांपुरते मर्यादित ठेवावे, सरकारी संस्थांनाच सर्टिफिकेशनचे अधिकार असावे ! 

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या मस्जिद बंदर येथे इमारतीला आग; धुरामुळे 2 जणांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश* *मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

vishwatmaklokswamivarta