vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गोराई पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठीआंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या-पर्यटन मंत्री शंभुराज देसाई

गोराई पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठीआंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या-पर्यटन मंत्री शंभुराज देसाई

मुंबई प्रतिनिधी : गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुमारे 128 एकर जमिनीचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळाप्रमाणे विकास केला जाणार असून, याबाबतचा आढावा पर्यटन, खनिकर्म तथा माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यासंदर्भातील सर्व प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले.

    मेघदूत या निवासस्थानी गोराई प्रकल्पाबाबतचा आढावा घेताना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. या बैठकीला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन विभागाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव विजय पोवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री देसाई म्हणाले की, गोराई येथील जागेचा विकास करताना तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन पार्क, वॉटर स्पोर्ट्स, रिसॉर्ट तसेच आकर्षक उद्यान आदी पर्यटकांना आकर्षित करतील अशा सर्वच सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील विकासकांना सहभागी करुन घेण्याचे निर्देश मंत्री देसाई यांनी दिले. पीपीपी तत्वावर हा प्रकल्प राबविला जावा.शासनाकडून सर्व परवानग्या घेवून हा प्रकल्प अत्यंत आकर्षक असा व्हावा यासाठी पर्यटन विभागाने लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.

मंत्री देसाई म्हणाले की, गोवा,केरळ मध्यप्रदेश येथील पर्यटन प्रकल्पांचाही अभ्यास केला जावा.आंतरराज्य अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन तज्ज्ञ नेमून हा प्रकल्प बनविण्यात यावा. या प्रकल्पाबाबत काम करताना प्रकल्पाशी संबंधित शासनाच्या हक्क आणि अधिकारांशी तडजोड न करण्याच्या सूचना मंत्री देसाई यांनी यावेळी केल्या.

0000

 

संबंधित पोस्ट

भागवत हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ-राहुल महाराज जोशी हभप दिनेश महाराज उंडे यांचे आज हरिकिर्तन

vishwatmaklokswamivarta

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी अति मुसळधार पावसाचा (Orange Alert) इशारा दिला आहे, तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असाही इशारा आहे.

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी 12 ओळखपत्रांना मान्यता कोणत्याही एका वैध ओळखपत्रावर मतदान करता येणार

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याबद्दल भाजपाच्या प्रतिनिधी मंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली. 

एकल महिलांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन खंबीर; ३० जून रोजी जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन