vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

भागवत हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ-राहुल महाराज जोशी हभप दिनेश महाराज उंडे यांचे आज हरिकिर्तन

भागवत हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ-राहुल महाराज जोशी हभप दिनेश महाराज उंडे यांचे आज हरिकिर्तन

जालना/प्रतिनिधी

भागवत ग्रंथ हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असून त्याचे श्रवण प्रत्येकाने केलेच पाहिजे, असा हितोपदेश हभप राहुल महाराज जोशी यांनी येथे बोलतांना दिला. येथील सहकार बँक कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प. पू. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या कृपाशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा व विजय ग्रंथ पारायण सोहळ्यास उत्साही वातावरणात प्रारंभ झाला आहे. यावेळी आयोजित भागवत कथेचे प्रथम पुष्प गुंफतांना राहुल म. जोशी हे बोलत होते. दरम्यान, उद्या शनिवारी दिनेश महाराज उंडे (देवाची आळंदी) यांचे हरिकिर्तन होणार आहे.

पुढे बोलतांना जोशी महाराज म्हणाले की, श्रीमद् भागवत ग्रंथाला सर्वश्रेष्ठ माणन्याचे काही प्रमाण शास्त्रात दिले आहेत. त्याचे अनुकरण करण्याची जबाबदारी आपणासर्वाची आहे. जन्मोजन्मीचं पुण्य यामुळे प्राप्त होतं. आज भागवत कथेचा प्रथम दिवस आहे. परंतू भागवत कथा कोणी कोणाला सांगितली. याबद्दल आपण सर्व जाणतो. यावेळी त्यांनी नारदमुनी, अहंकार, सुत, देवऋषी, देवी भागवत यांचीही कथा अत्यंत सुंदर असे वर्णन करुन सांगितली. त्यांनी यावेळी विविध भजनं आपल्या कथेदरम्यान गायिली. त्यात मस्तक माझे पायावरी । या हो वारकरी संताच्या ॥ या भजनाचाही समावेश होता.

या सप्ताहात रविवार दि. 16 फेब्रुवारी रोजी हभप सोनवणे महाराज गुरुजी, सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी राजेद्र महाराज वाघमारे आणि मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी हभप श्रीहरी रसाळ महाराज तर बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी हभप प्रा. उध्दव महाराज राऊत (आळंदी), गुरुवार दि. 20 फेब्रुवारी रोजी हभप त्रिंबक महाराज दस्तापुरकर यांचे हरिकिर्तन होणार असून शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी रोजी ंंहभप डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तर याच दिवशी तत्पूर्वी श्री. गजानन महाराज पालखी मिरवणूक (दिंडी) सोहळा होणार आहे. यानिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार असून दररोज सकाळी काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, श्री. गजानन विजय ग्रंथ पारायण, त्यानंतर गाथा भजन तर दुपारी 1 ते 5 यावेळेत श्री. भागवत कथा होणार आहे. तर सायंकाळी हरिपाठ व रात्री 9 ते 11 यावेळेत हरिकिर्तन व त्यानंतर हरीजागर होणार आहे. तत्पूर्वी भागवत पुजन व समाप्ती महाआरती सौ. व श्री. सिमा शामराव भांदरगे यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रगट दिनाचा महाप्रसादाचे मुख्य यजमान सौ. व श्री. सरिता दत्तात्रय शेजुळ हे राहणार असून भजनी मंडळ आणि किर्तन सेवेस साथ देणार आहेत मृदंगाचार्य हभप भगवान म. जाधव व तुकाराम म. मुढे, गायनाचार्य हभप हभप विष्णू म. सावंत हे ज्ञानेश्वर म. जोशी, भगवान म. लकडे, गिरी महाराज, रमेश प. पवार, यादव म. जाधव, उध्दव म. राठोड तर हरिपाठाचे नेतृत्व हभप विष्णू म. सावंत हे करणार आहे.तर श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण व्यासपीठ प्रमुख म्हणून हभप आत्माराम महाराज बिडवे हे काम पाहत आहेत. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गजानन महाराज विश्वस्त मंडळाचे सचिव श्री. सपंतराव पाटील व समस्त विश्वस्तांनी केले आहे.

——————————————————

संबंधित पोस्ट

महा-देवा फुटबॉल उपक्रम’अंतर्गत निवडक ६० विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार – क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा – पालकमंत्री संजय शिरसाट पालकमंत्र्यांनी घेतला विविध विषयाचा आढावा

जीवनात गुरुला खूप मोठे महत्व-सुनिताजी चावला

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुक मार्गात बदल..

उन्हाळी सुट्टीतही जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थांना मिळणार अध्ययनाचे धडे..

vishwatmaklokswamivarta

प्राचार्य राजाराम राठोड अनंतात विलीन.. तांडा वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील- मंत्री संजय राठोड