vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*

*रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*

लातूर प्रतिनिधी-रेणा नदीवरील रेणापूर, जवळगा, बंधारा येथील पाणी पातळी पूर्ण संचय पातळीला आहे व सद्यस्थितीत बांधा-यामधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रेणा नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सर्वांनी सतर्क राहून विशेष खबरदारी घ्यावी, नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच आपल्या मालमत्तेची आणि जनावरांची काळजी घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ, नदीजवळ जावू नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरुन, नाल्यावरुन पाणी वाहत असतांना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जावू नये. पाऊस सुरु असतांना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

मुठा नदीवरील धोकादायक पूल कायमस्वरूपी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश

आयटीआय गटनिदेशकांना मिळणार पदोन्नतीआमदार सुधाकर अडबाले यांचे निर्देश : सहसंचालक यांचे बैठकीत आश्‍वासन..

सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि समाजसेवकांचा सन्मान

कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवार सहकुटुंब शासकीय महापूजा संपन्न बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीवभाव…

vishwatmaklokswamivarta

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई शहर आता ‘रिसायकल हब’ – पर्यावरणशीलता जपणुकीसाठी पुनर्वापरातून पुढाकार