vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

आयटीआय गटनिदेशकांना मिळणार पदोन्नतीआमदार सुधाकर अडबाले यांचे निर्देश : सहसंचालक यांचे बैठकीत आश्‍वासन..

आयटीआय गटनिदेशकांना मिळणार पदोन्नतीआमदार सुधाकर अडबाले यांचे निर्देश : सहसंचालक यांचे बैठकीत आश्‍वासन..

गडचिरोली : प्रतिनिधी मागील दोन वर्षांपासून रखडलेली आयटीआय गटनिदेशक पदोन्नतीचे ऑर्डर विनाविलंब काढावे, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी निर्देश दिले असता नागपूर विभागातील आय.टी.आय. निदेशकांच्या विविध प्रलंबित समस्या निवारणार्थ समस्‍या निवारण सभेत सहसंचालक यांनी २० जून २०२५ पूर्वी पदोन्नतीचे ऑर्डर काढू असे आश्वासित केले.

आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने नागपूर विभागातील आय.टी.आय. निदेशकांच्या विविध प्रलंबित समस्या निवारणार्थ समस्‍या निवारण सभा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर येथे सहसंचालक श्री. मोटघरे यांच्यासोबत पार पडली.

यावेळी सभेत LWE plan अंतर्गत नवीन नियुक्त निदेशकाचे थकीत वेतन कायम स्वरूपी तोडगा काढून विनाविलंब अदा करण्यात यावे तसेच दि. ८/३/१९९९ प्रमाणे स्थायी झालेल्या निदेशकांना त्यांच्या मूळ नियुक्ती पासून अभावीत सेवेचा लाभ देताना १२ व २४ वर्षाचे प्रस्ताव एकत्रितरित्या काढावे तसेच २४ वर्षाचे लाभ देताना एकूण जागेच्या २०% मधून गटनिदेशक यांना वगळण्यात यावे, कच्चा मला पर्याप्त मात्रामध्ये उपलब्ध करून द्यावा, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, विद्यावेतन वेळेवर अदा करण्यात यावे, सेवानिवृत्ती नंतरचे लाभ विनाविलंब देण्यात यावे, COE /AVTS बंद झालेल्या व्यायवसायाचे वस्तू व मशीन भांडारात जमा करण्यात यावे, निदेशकाचे वार्षिक सीआरची नोंद सर्व्हिस बुक मध्ये घेणे, दुय्यम सर्व्हिस बुक अपडेट करून देण्यात यावे व संस्था स्तरावरील मशीन, टूल्स निर्लेखन दर सहा महिन्यांनी व्हावे आणि तशी निर्लेखित झालेली वस्तू निदेशकाच्या चार्जेसमधून कमी व्हावी, DSR नोंदी चुकीच्या असल्यास स्थानिक प्राचार्य यांनी दुरुस्ती करून देण्यास पुढाकार घ्यावा तसेच या सभेमध्ये चर्चा करण्यात आलेले सर्व विषय पुढच्या सभेपर्यंत सुटलेले असावे, असे निर्देश नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले. सर्व प्रलंबित प्रश्‍नांवर सकारात्‍मक चर्चा करून सभेत ठरलेल्‍या नियोजित वेळेत समस्‍या सोडविण्याचे आश्‍वासन सहसंचालक श्री. मोटघरे यांनी यावेळी दिले.

यावेळीप्रादेशिक कार्यलयाचे उपसंचालक भुते, म.रा. आयटीआय निदेशक संघटनेचे राज्‍य मार्गदर्शक विनोद दुर्गपुरोहित, राज्य सहचिटणीस शिवाजी ढुमणे,राज्य सदस्य साहेबराव गुढधे,नागपूर विभागीय अध्यक्ष प्रेमानंद भैसारे, सचिव सचिन माळीचकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, नागपूर महानगर कार्यवाह अविनाश बडे, कार्याध्यक्ष अरुण कराळे, उपाध्यक्ष जितेंद्र टोंगे, खजिनदार मुकेश मेश्राम, सहसचिव विपिन मेश्राम, सदस्य धीरज सव्वालाखे, अपील रंगारी, महिला सदस्य माधुरी बालपांडे, माजी अध्यक्ष अविनाश गभणे, माजी सचिव धनंजय पाटील, नागपूर ITI शाखा अध्यक्ष सिद्धार्थ मेहरे श्री.चव्‍हाण, किशोर पाचभाई यांच्यासह नागपूर विभागातील विविध आय.टी.आय. मधून निदेशक,निदेशका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण

वेण्णा लेकवरील ड्रोन शोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उद्घाटन*   *महाराष्ट्र पर्यटनामध्ये देशात प्रथम क्रमांकावर आणणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* 

vishwatmaklokswamivarta

दुध भेसळ प्रकरणी गाय दुधाचा 10 लाख 63 हजार किंमतीचा साठा नष्ट- सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे

आनंदनगर येथील अजंता बुध्द विहार जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलेश झाडेवाले तर सचिव पदी विकी साबळे यांची निवड…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्स, स्टेमी उपकरणांचे लोकार्पण जागतिक हृदय दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम..

vishwatmaklokswamivarta

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन