vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वेण्णा लेकवरील ड्रोन शोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उद्घाटन*   *महाराष्ट्र पर्यटनामध्ये देशात प्रथम क्रमांकावर आणणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* 

*वेण्णा लेकवरील ड्रोन शोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उद्घाटन*   *महाराष्ट्र पर्यटनामध्ये देशात प्रथम क्रमांकावर आणणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

 

सातारा प्रतिनिधी- महाबळेश्वर येथील महापर्यटन उत्सवांतर्गत वेण्णा लेक येथे आयोजित नेत्रदीपक ड्रोन शोचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रात पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे. जगभरातील तसेच देशातील पर्यटक आकर्षित करून महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर राहील यासाठी प्रयत्न करणारा असल्याचे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार अतुल भोसले उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचे अत्यंत देखणे व सुंदर पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला महाराष्ट्रातील पर्यटकांनी मोठा प्रतिसाद दिला. पुढील काळातही अशा पद्धतीने विविध ठिकाणी उत्सवांचे आयोजन केले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

ड्रोनच्या माध्यमातून आकाशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, प्रतापगड, तुतारी वाजवणारा माणूस, ढोल वाजवणारा माणूस, मंदिर यासह विविध कलाकृती तयार करण्यात आल्या. उद्घाटनाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लेझर शोचाही आनंद घेतला.  कार्यक्रमाला पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

0000

संबंधित पोस्ट

मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया उद्योगांना मोठे अनुदान10 टन क्षमतेचे तेल काढणी युनिट, मिनी ऑईल मिल, 250 मे. टन गोदाम व कडधान्य प्रक्रिया-पॅकेजिंग युनिटसाठी अर्जाची मागणी,राष्ट्रीय खाद्यतेल अभियान व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ आणि पैठण, आपेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्या बाबत आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट आरोपीवर कठोर कारवाईसाठी शासन कटिबद्ध; फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविणार

विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणांना गती देण्याच्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या सूचना  जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न