vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, प्रतिनिधी : मत्स्यव्यवसायात राज्याला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य शासनाने अनेक योजना, उपक्रम सुरू केले आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. या माध्यमातून मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र नंबर वन करण्यात येईल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, कृषी समकक्ष दर्जा व त्या अनुषंगाने सवलती आणि केंद्र शासनाच्या योजना अंमलबजावणीबाबत भा.कृ.अनु.प. (भारतीय कृषी अनुसंधान परिषद)- केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्था, वर्सोवा येथे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, एमएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्थेचे, संचालक डॉ.एम.शाहु आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय मंत्री निजेश राणे म्हणाले, मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेस अन्य योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीस देऊन त्याला अधिक सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे. विभागाच्या योजनांची व्यापक प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी जिल्हास्तरावर कॅम्प घेऊन जनजागृती करावी. तसेच यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगत, मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले, भविष्यात राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांचा अभ्यास अन्य राज्यांनी करावा यासाठी विभागातील सर्वच घटकांनी टीमवर्क म्हणून काम करावे. योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव केला जाईल. असे मंत्री राणे यांनी सांगितले.

मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन. रामास्वामी म्हणाले, मत्स्यव्यवसायमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यस्तर व जिल्हा नियोजनमधून २८ योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हास्तरावरील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा नियोजनमधून अधिकचा निधी अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून घ्यावा. मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना क्लस्टर पद्धतीने राबविल्या जाणार असून या योजनांच्या माध्यमातून उत्पादकता वाढण्यास मदत होईल. विभागाच्या योजनांची लाभार्थी निवड देखील अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर करावी.

मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या, अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा भाग आहे. विभागाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करून मत्स्यव्यवसायाला अधिक गती देण्यासाठी विभागाच्या योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचवण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

संबंधित पोस्ट

देऊळगाव राजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 9 जुलैला

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पदभरती

जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुक; अंतिम प्रभाग रचना जाहीर

विकसित भारताचे ध्येय साधण्यासाठी भारताची नवउद्योजकांचा देश ही ओळख निर्माण करा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाचा २७ वा दीक्षान्त समारंभ थाटात

vishwatmaklokswamivarta

उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री- संजय शिरसाट 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाचा स्टेट बॅंकेच्या सहकार्याने उपक्रम;जि.प.शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप..

vishwatmaklokswamivarta