vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दुध भेसळ प्रकरणी गाय दुधाचा 10 लाख 63 हजार किंमतीचा साठा नष्ट- सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे

 दुध भेसळ प्रकरणी गाय दुधाचा 10 लाख 63 हजार किंमतीचा साठा नष्ट- सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे

        सांगली, प्रतिनिधी : अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयाने दुध वाहतुक करणाऱ्या टॅंकरची कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे तपासणी मोहिम राबविली. या मोहिमेत 5 टॅंकरमधील एकूण 75 हजार लिटर दुधाची प्राथमिक तपासणी करण्यात आली. या कारवाईत गाय दुधामध्ये भेसळीच्या संशयावरून 10 लाख 63 हजार 860 रूपये किंमतीचा 30 हजार 396 लिटर गाय दुधाचा साठा नष्ट करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. पवार व श्री. स्वामी, नमुना सहाय्यक श्री. कवळे व श्री. कसबेकर यांनी नागज फाटा येथे थांबून तेथून जाणाऱ्या 05दुध वाहतुक वाहनांची तपासणी केली. या टॅंकरमधील दुधाची इन्स्टंट स्ट्रीपच्या सहाय्याने भेसळीची प्राथमिक तपासणी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा सह. दुध उत्पादक संघ (गोकुळ ) व वारणा डेअरी, कोल्हापूर येथे जाणाऱ्या टॅंकरमधील दुधाचे 3 नमुने विश्लेषणाकरीता घेण्यात आले. टॅंकर क्र. एम एच 09 जी आर 5567 मधील गाय दुधाची प्राथमिक तपासणी केली असता त्यामध्ये मीठाची भेसळ आढळल्याने अन्न सुरक्षा अधिकारी श्री. पवार यांनी या टॅंकरमधून दोन कप्प्यामधून गाय दुधाचे दोन नमुने विश्लेषणाकरीता घेऊन गाय दुधाचा 10 लाख 63 हजार 860 रूपये किंमतीचा 30 हजार 396 लिटर गाय दुधाचा उर्वरीत साठा भेसळीच्या संशयावरुन ओतून नष्ट केला. या गाय दुधाचा टॅंकर घेरडी तालुका सांगोला येथील एल के पी दुध शितकरन केंद्र येथून गाय दुध घेवून हामीदवाडा ता. कागल जिल्हा कोल्हापूर येथील दत्त इंडीया प्रा. लि. या कंपनीस जात असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही घेण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 नागरीकांना अन्न पदार्थामधील भेसळीबाबत काही माहिती असल्यास तसेच अन्न पदार्थांबाबत काही तक्रारी असल्यास अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क करुन किंवा ई मेल आयडी fdasangli@gmail.com यावर माहिती किंवा तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न ) श्री. मसारे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी आज मनसेच्या विभाग अध्यक्षांच्या बैठकीत दिला

इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे १९४ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण

vishwatmaklokswamivarta

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल राज्यपालांकडून स्वारातीमच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप…

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली शेगाव येथील तयारीची पाहणी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारी ग्रुपच्या 10 गिगावॅट इंटिग्रेटेड सोलर इंगॉट अँड वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचे भूमिपूजन. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित

विकासकामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करावेत – पालकमंत्री अतुल सावे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न