vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केरा व मणदुरे उपसासिंचन योजनेचा आराखडा तयार होतात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल- पालकमंत्री शंभूराज देसाई

केरा व मणदुरे उपसासिंचन योजनेचा आराखडा तयार होतात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी- केरा व मणदुरे भागातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील सिंचनासाठी सर्वेक्षण होणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आराखडा तयार होईल. यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली

केरा, मणदुरे विभागातील निवकणे चिटेघर व बिबी या लघु प्रकल्पाच्या दोन्ही तीरावरील गावांना 100 मीटर उंचीपर्यंत शेतीसाठी उपसा सिंचनाद्वारे पाणी उचलून देण्याच्या सर्वेक्षण कामाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाला. केरळ तालुका पाटण येथे झालेल्या कार्यक्रमास दादासाहेब जाधव, दादासाहेब पाटील, भरत पाटील, अभिजीत पाटील, एन डी पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

केर व मणदुरे या भागातील नागरिक पिढ्यानपिढ्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या भागाला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 100 मीटर अंतर पाणी शासनामार्फत तारळी पॅटर्न प्रमाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे पाणी धरणातून व केरळा नदीच्या पात्रातून दोन्ही तीरावरील गावांना उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

केरा व मणदुरे या भागाला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विविध बैठका घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा केला. उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे या भागाचा कायापालट होणार आहे. पीक पद्धतीही बदल होणार आहे तसेच रोजगारासाठी होणारे स्थलांतरही थांबणार आहे. सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी शुभारंभ प्रसंगी केला.या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

धनगर समाज आरक्षण मोर्चानिमित्त वाहतूक मार्गात बदल ..

vishwatmaklokswamivarta

आर्ट ऑफ लिविंग ने आयोजित केलेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे अध्यक्ष पद भारताच्या माननीय राष्ट्रपती भूषवणार*

vishwatmaklokswamivarta

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पदभरती

अतिवृष्टीग्रस्त मदतीचे जिल्ह्यात ६७ कोटी ४३ लक्ष रुपयांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

१९६२ कॉल सेंटर’ व मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांचे आज तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी मुंबईत आगमन