vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भव्य रक्तदान शिबीर व सत्संग सोहळा

भव्य रक्तदान शिबीर व सत्संग सोहळा

जालना प्रतिनिधी: मानवतेच होईल भल, जर रक्तदान करता आलं.रक्त नालियों में न बहे, वो नाडीयो में बहे, याच न्यायाने येथील संत निरंकारी मंडळाच्यावतीने शुक्रवार दि.24 एप्रिल 2026 रोजी भव्य रक्तदान व सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार्या या रक्तदान शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत

24 एप्रिल हा दिवस बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराज यांच्या आठवणी प्रित्यर्थ मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसा निमित्त सद्गगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असिम कृपेने फक्त भारतातच नव्हे तर (जग भरात) दुर देशातही भव्य रक्तदान शिबिराचे संत निरंकारी चॅरिटेबल फाऊडेशनतर्फे वर्षभर आयोजन केले जाते.

रक्तदान हे मानवतेच्या नात्याने आपले कर्तव्यच आहे. या गोष्टीचे भान ठेऊन मानव एकता दिवसानिमित्त जालना जिल्ह्यातील रक्ताची उणिव भरुन काढण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना. यांच्या मदतीने संत निरंकारी मंडळ, शाखा जालना यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन शुक्रवार दि.24 एप्रिल 2026 रोजी संत निरंकारी सत्संग भवन, गांधी चमन , जुना जालना, जालना येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी शहरातील रक्तादात्यांसह नातेवाई, मित्र मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संत निरंकारी मंडळाचे जालना शाखेचे संयोजक राजकुमार परसवाणी यांनी आव्हान केले आहे. मानव एकता दिनानिमित्त विशाल सत्संग समारोहात लोणी शाखेचे मुखी ता.राहता जि. अहिल्यानगर प. पु. आ. अशोकरावजी गडगे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत आयोजित केला असून सोहळ्यास पंचकोशितील भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे

संबंधित पोस्ट

२३ एप्रिल रोजी लोकशाही जागरातून शंभर टक्के मतदानाचे आवाहन-राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती उपक्रम

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धेसाठी 26 ऑगस्टपूर्वी अर्जाचे आवाहन

अमरावती मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथेमाजी सैनिकांसाठी लिपिक पदांची भरती

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या इस्रो अभ्यासदौऱ्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

आईसाठी एक जिवंत आदरांजली: ठाण्यात मातृदिनानिमित्त अभिनव उपक्रमांची प्रेरणादायी सुरुवात*

जिल्हास्तरीय मुस्लिम धार्मिक तबलीगी इज्तेमा कार्यक्रम दि.३ ते ५ दरम्यान आयोजीत वाहतूक मार्गात बदल…

vishwatmaklokswamivarta