vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआइडी व आधार कार्ड ३१ मार्चपूर्वी जमा करावे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआइडी व आधार कार्ड ३१ मार्चपूर्वी जमा करावे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड, प्रतिनिधी:- दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार राज्यातील दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण ओळखपत्र युडीआइडी कार्ड, ई-दिव्‍यांग प्रमाणपत्र (E-Disability Certificate) व आधार कार्ड संबंधित योजनांशी संलग्न करणे आवश्यक करण्यात आले आहे.

राज्य शासनामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले युडीआइडी कार्ड व आधार कार्ड संबंधित कार्यालयात तात्काळ जमा करावे.

शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी DBT पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे योजनांचा लाभ अखंडपणे सुरू राहण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे अत्यावश्यक आहे.

तरी तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड व आधार कार्ड संबंधित तहसील कार्यालय येथे 31 मार्चपूर्वी तात्काळ जमा करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

पद्मपुरस्कार २०२७ साठी नामांकन/ शिफारसी मागवण्याची प्रक्रिया १५ मार्च २०२६ पासून सुरु झालेली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ …

पाऊस ओसरताच पंचनामे तात्काळ पूर्ण करा**अतिवृष्टीबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या**- पालकमंत्री शंभूराज देसाई*

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज -उत्तम दिघे

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राने स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत *भारताच्या सर्वात ‘स्वच्छ राज्य’चा प्रतिष्ठेचा किताब पटकावला! राज्यातून – 1 सेवन स्टार, 2 फाइव स्टार, 82 वन स्टार गार्बेज फ्री शहरांचा दर्जा आणि 261 ओडीएफ़ प्लस प्लस शहरांचा मान मिळाला

महाराष्ट्र शासनाचे ४, ८, ९ व १० वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

चित्ररथाद्वारे योजनांची व्यापक जनजागृती; नागरिकांनी लाभ घ्यावा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल