vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

नांदेड प्रतिनिधी :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून . बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी मंगळवार 10 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी यांच्या येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सैनिक कल्याण विभागात लिपीक टंकलेखकांची भरती; 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत..

vishwatmaklokswamivarta

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा येथेशिकाऊ उमेदवारांची भरतीØ पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार व इंटर्नशिप मेळाव्याचे आयोजन…

जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदभरती; समुपदेशनासाठी यादी संकेतस्थळावर येणार

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख**देशी गोवंशाच्या संरक्षणाला चालना; गायींच्या परिपोषणासाठी अनुदान योजना*

vishwatmaklokswamivarta