vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

काँग्रेस चे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर त्यांच्या राहत्या घरी निधन

काँग्रेसचे पक्षाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन…

राज्य प्रतिनिधी-काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज (12 डिसेंबर) सकाळी 6.30 वाजता निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. लातूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले चाकूरकर यांनी लातूरचे नगराध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री असा राजकीय प्रवास केला होता.

चाकूरकर यांच्या परिवारातील विवाह सोहळ्यासाठी शिवराज पाटील चाकूरकर हे खास दिल्लीवरून लातूरला आले होते.

मात्र लातूरला आल्यानंतर अचानक अशक्तपणा आल्याने चाकूरकर यांची प्रकृती खालावली. चाकूरकर यांच्यावर त्यांचे फॅमिली डॉक्टर चाकूरकर यांच्या देवघर या निवासस्थानीच उपचार करत होते. डॉक्टरांची टीम देखील सोबत होती.

5 डिसेंबरपासून शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रकृती आणखी खालावली होती, अगदी अन्नपाणी देखील घ्यायला चाकूरकर यांनी नकार दिला होता.

अशा परिस्थितीत अगदी एअर रुग्णवाहिकेने शिवराज पाटील चाकूरकर यांना दिल्लीला हलवण्याची चाचपणीही केली होती

मात्र स्थानिक डॉक्टरांनी अशा परिस्थितीमध्ये त्यांना दुसरीकडे शिफ्ट करणे योग्य नसल्याचा सल्ला दिला. त्यामुळे चाकूरकरांना हलवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला. शनिवारी (13 डिसेंबर) बोरवटी गावातील त्यांच्या शेतात 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

संबंधित पोस्ट

मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात बदल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये महावितरणने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन..     

vishwatmaklokswamivarta

भारतीय टपाल विभागाच्यावतीने ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सन्मान

जम्मू कश्मीर येथील येथे झालेल्या हल्ल्याबाबत….

“सन्मान ‘ती’चा-अभिमान छत्रपती संभाजीनगरचा” जागतिक महिला दिनी (दि.८) सुपर वुमन बाईक रॅली

वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ*मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची उपक्रम*

आयटीआय गटनिदेशकांना मिळणार पदोन्नतीआमदार सुधाकर अडबाले यांचे निर्देश : सहसंचालक यांचे बैठकीत आश्‍वासन..