vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पूर्वतयारी प्रशिक्षणऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पूर्वतयारी प्रशिक्षणऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

अहिल्यानगर, प्रतिनिधी : राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने महाज्योतीमार्फत जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी २०२६-२८ बॅचसाठी मोफत ऑनलाइन पूर्वतयारी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद लोंढे यांनी केले आहे.

महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने दर्जेदार प्रशिक्षण दिले जाणार असून टॅबही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. संबंधित विद्यार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. विद्यार्थी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. तसेच विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी हा नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा. विद्यार्थ्यांची निवड इयत्ता दहावीतील गुणांची टक्केवारी, सामाजिक प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे.अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, इयत्ता दहावीची गुणपत्रिका, दिव्यांग असल्यास संबंधित प्रमाणपत्र तसेच अनाथ असल्यास त्याबाबतचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकित करून स्पष्ट दिसतील अशा पद्धतीने स्कॅन करून जोडावे

00000

संबंधित पोस्ट

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानगुरुवारी रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन

vishwatmaklokswamivarta

संक्रांतपर्वात बचतगटाच्या महिलांचे दानाचे वाण-सैनिक कल्याण निधीसाठी १० हजार रुपयांचे योगदान

vishwatmaklokswamivarta

उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे परवाने जलदगतीने मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक यंत्रणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आठ हजार कोटींचा सामंजस्य करार…

vishwatmaklokswamivarta

स्पर्श प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा सैनिक संकुलात स्पर्श प्रणाली मेळावा, आजही कामकाज सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta

मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा; मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर पूर्ण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

स्त्री ही नैसर्गिक शक्तिमान असती तिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास तिला अधिक लढण्याची बळ मिळते –संजीवनी ताडेगावकरआधार ग्रुपने केला विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव

vishwatmaklokswamivarta