vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वसरणी येथील महाराजस्व शिबिरात १४७४ प्रमाणपत्रांचे वाटप महाराजस्व शिबिराच्या माध्यमातून प्रशासन सामान्य माणसापर्यंत पोहोचतेय : डॉ. सचिन खल्लाळ

नांदेड प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रशासन सामान्य माणसापर्यंत पोहोचत आहे . जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यात येत आहे ,असे मत नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी व्यक्त केले. वसरणी महसूल मंडळ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज 14 मे रोजी आयोजित करण्यात आले ,यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते .या शिबिरात ८७१ सातबारा ,५९१ आठ अ चे उतारे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे बारा लाभार्थी असे एकूण 1475 तर इतर विभागाकडून अनेक लाभार्थ्यांना लाभाचे कार्ड वितरित करण्यात आले.

डॉ. सचिन खल्लाळ म्हणाले की, महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नांदेड तालुक्यात जवळपास १० हजार लोकांपर्यंत पोहोचलो आहोत .लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यात प्रशासन यशस्वी होत आहे ,असे ते यावेळी म्हणाले. यावेळी तहसीलदार संजय वारकड ,नायब तहसीलदार महसूल सुनील माचेवाड , स्वपनील दिघलवार,तालूका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रविण मुंडे,वैदयकिय अधिकारी तुप्पा गुडपे, मंडळ कृषी अधिकारी सुनील सानप,धनेगावचे सरपंच पिंटू पाटील शिंदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावं, हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले तसेच आतापर्यंत २२ हजार लोकांना विविध प्रमाणपत्र दिली असल्याचे ते म्हणाले. त्यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने महसूल विभाग, निवडणुक विभाग ,विशेष सहाय्य विभाग,आरोग्य विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख, नोंदणी विभाग, महावितरण ,आधार केंद्र ,आपले सरकार केंद्र, अनुलोम संस्था आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी वसरणी मंडळाचे मंडळ अधिकारी सय्यद मोहसिन ,ग्राम महसूल अधिकारी आर .पी .मुंडे, संजय वानोळे, दीपक सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले .यावेळी मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, संतोष अस्कुळकर,श्रीकृष्ण येलमटे, ग्राम महसूल अधिकारी रमेश गिरी, मनोज सरपे, मारुती जमदाडे ,श्रीरामे यावेळी उपस्थित होते. तसेच विशेष सहाय्य विभागाचे श्रीमती प्रीतिका मुडगुलवार , संतोष वाघमारे, बालाजी सोनटक्के, गणेश वाघमारे ,प्रतीक्षा गायकवाड आदी उपस्थित होते.

आधार व सेतू केंद्राचे विजय जोंधळे ,नागनाथ स्वामी ,राजश्री मिरजकर तसेच अनुलोम सामाजिक संस्थेचे राम मुलांगे, पूजा गोडघासे, सुषमा शिंदे, दिपाली भुसेवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी नांदेड केंद्राच्या निवेदिका राजश्री मिरजकर यांनी तर आभार मंडळ अधिकारी सय्यद मोहसिन यांनी मानले.

0000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांसाठी उपसा जलसिंचन वीजदर सवलतीत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

वटसावित्री पौर्णिमा निमित्त पैठण रोड विटखेडा वार्डात 1001 वडाच्या रोपांचे वाटप. सौभाग्याचे प्रतीक असलेल्या पवित्र अशा वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्त..

परभणीसाठी उदयोन्मुख जिल्हा दर्जा, झोन-१ व डी+ श्रेणी मंजूर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रयत्नांना यश

vishwatmaklokswamivarta

हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

vishwatmaklokswamivarta

महाडच्या वरंध घाटातील अपघात ग्रस्त प्रवाश्यांची मंत्री गोगावले यांनी केली विचारपूस

कारकिर्दीच्या यशस्वीतेत टीम वर्क महत्वाचे-मुख्य सचिव राजेश कुमार

vishwatmaklokswamivarta