vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाडच्या वरंध घाटातील अपघात ग्रस्त प्रवाश्यांची मंत्री गोगावले यांनी केली विचारपूस

महाडच्या वरंध घाटातील अपघात ग्रस्त प्रवाश्यांची मंत्री गोगावले यांनी केली विचारपूस

 

रायगड प्रतिनिधी- महाड एसटी डेपोच्या रामदास पठार ते महाड बस क्रमांक एम एच 20 बी एल 38 22 या एसटीला दिनांक 15 मार्च 2025 रोजी महाडच्या दिशेने परतत असताना वरंध घाटात बेबीचा गोल ठिकाणी अपघात झाला. या अपघातात जवळपास 18 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहॆ. या सर्व जखमी प्रवश्यांची फलोत्पादन, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी  ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे भेट देऊन विचारपूस केल. तसेच जखमीवर सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेतली

सर्व जखमीना ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तरी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहॆ. मंत्री श्री गोगावले यांनी जखमींची विचारपूस केली आणि संबंधित डॉक्टरांकडून रुग्णांच्या उपचारासंबंधी माहिती घेतली.

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप हंगाम अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी

वारणा धरणात 28.34 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 25.31 टी.एम.सी. पाणीसाठा

राजा रघुवंशी हत्या प्रकरण- हनिमूनदरम्यान मेघालयात बेपत्ता झालेली  सोनम रघुवंशी  सापडली! पोलिसांचा खळबळजनक दावा सी.एम चाही मोठा खुलासा…

अनुकंपा उमेदवारांना शनिवारी नियुक्तीपत्रे वाटप होणार !· जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन· एमपीएससीच्या ५० उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे मिळणार

एक जिल्हा, एक उत्पादन- 2024’ पुरस्कारात महाराष्ट्राची चमकदार कामगिरी राज्याला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक कृषी आणि गैर कृषी क्षेत्रात रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी..