vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिट्टी प्रकाश महाजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिट्टी प्रकाश महाजन

 

राज्य प्रतिनिधी: मनसेची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या प्रकाश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला. माझा थोडं वय वाढलं आहे आणि काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. त्यामुळे मी थांबायचे ठरवले आहे. माझा बाकी कोणावर राग नाही असे त्यांनी पक्ष सोडल्यानंतर म्हटले होते. मात्र, आज पहिल्यांदाच त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.

राज ठाकरे हिंदुत्वाचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करावा, त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा का सोडला कळत नाही?,

असे म्हणत पहिल्यांदाच मनसेप्रमुखांना लक्ष्य केलं. गंगेतील स्नान आणि पाण्याच्या मुद्द्यावर जाहीर व्यासपीठावरुन राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेचा व्हिडिओ दाखवत प्रकाश महाजनांची थेट मनसेवर टीका केली.

मन शुद्ध नसेल तर बिसलेरीच्या पाण्याची अंघोळ देखील गटारीच्या पाण्याची वाटू शकते, असा खोचक टोलाही लगावला.

नरेंद्र मोदी देशात आल्यानंतर हिंदूंकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आहे. पण, उद्धव ठाकरे यांनी ब्राह्मण समाजाला चिडवण्यासाठी टीका केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. शरीरावर चिटकलेल्या त्वचेसारखं राज ठाकरेंचं हिंदुत्व, अशी व्याख्या मी केली. मात्र, आता महानगरपालिकेतील मतांसाठी राज ठाकरेंनी मवाळ भूमिका घेतली, अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

संबंधित पोस्ट

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन साजरा

vishwatmaklokswamivarta

महापुरुषांविषयी अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल सोलापुरकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार कारवाई करा चंद्रकांत रत्नपारखे यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

आहार, आरोग्य व अध्यात्मिक शिबीराचे रविवारी आयोजन

vishwatmaklokswamivarta

निबंध व चित्रकला स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा थाटातजिल्हा पोलिस दल आणि जिल्हा पत्रकार संघ आयोजित ‘मिशन परिवर्तन’ स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग….

vishwatmaklokswamivarta

आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्रींचे निधन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कुटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट

शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये; दुबार पेरणीचे संकट टाळण्याचे कृषी विभागाचे आवाहन