vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन..

देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती निमीत्त व राजमाता जिजाऊ जयंती निमीत देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक पी.बी.दुर्गे यांनी दिली.

कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून उद्योजकता प्रेरणा कार्यकम आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे उदघाटन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांच्या कलागुणांना तसेच कौशल्यांना वाव मिळावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने 09 ते 11 जानेवारी 2025 या कालावधी संस्थेमध्ये वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व क्रिडा स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

12 जानेवारी रोजी प्रमुख वक्ते मसिआचे उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, लेखाधिकारी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. एस. भिंगारे यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय सहसंचालक पी.टी.देवतळे,रूचा इंजिनियर्सचे उमेश दशरथी, आएएमसीचे अध्यक्ष अशिष गर्दे, महापारेषणचे अधिक्षक अभियंता रंगनाथ चव्हाण उपस्थितीत राहणार आहेत.विविध स्पर्धेत विजयी ठरलेल्या विजेत्यांना बक्षीसाचे वितरण व संस्थेतील मागील काळात उत्तीर्ण होऊन यशस्वी उद्योजक झालेले संस्थेचे माजी विद्यार्थी यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक पी.बी.दुर्गे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

गेल्या २ दिवसात पावसामुळं झालेल्या विविध दुर्घटनात गुजरातमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

vishwatmaklokswamivarta

अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे,· तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू

पाणी पेटलं! तहानलेल्या गावांसाठी घाटगे पाटलांचा एल्गार, अधिकाऱ्यांची बोलती बंद!गोदावरी नदीवरील कॅनॉल दरवाजे उघडून शेतकऱ्यांसाठी सोडले पाणी….

महाडीबीटी पोर्टलवरून प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती बैठक जलजिवन मिशन कामांची तालुकानिहाय पाहणी करा-खा.भुमरे

vishwatmaklokswamivarta

मागासवर्गीय मुलींसाठी मोताळा येथील वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू