vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती बैठक जलजिवन मिशन कामांची तालुकानिहाय पाहणी करा-खा.भुमरे

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती बैठक जलजिवन मिशन कामांची तालुकानिहाय पाहणी करा-खा.भुमरे

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- जलजिवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय झालेल्या कामांची पाहणी करावी,असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष खा. संदिपान भुमरे यांनी आज दिले.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण अर्थात दिशा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी खासदार संदिपान पाटील भुमरे हे होते. तसेच राज्याचे इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकास व उर्जा नुतनीकरण मंत्री अतुल सावे, समितीचे सह अध्यक्ष राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड व लोकसभा सदस्य डॉ. कल्याण काळे तसेच विधान परिषद सदस्य आ. संजय केणेकर, विधानसभा सदस्य आ. रमेश बोरनारे, आ.संजना जाधव, आ. अनुराधा चव्हाण,आ. विलास भुमरे, राज्य समितीचे सदस्य अजिनाथ धामणे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे तसेच सर्व यंत्रणा प्रमुख आदी उपस्थित होते.

प्रारंभी दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावर सदस्यांनी चर्चा केली. त्यात केंद्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), स्वच्छ भारत मिशन शहरी, जलजीवन मिशन, एकीकृत बालविकास योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अभियान, समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामाची, घरकुल योजनेत होत असलेल्या कामांची, जलजीवन मिशन योजनेच्या कामांची पाहणी करण्यात यावी असे निर्देश खा. संदिपान भुमरे यांनी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

गौण वनोपजांकरिता वाहतूक परवानाबाबत कार्यपद्धती निश्चित* 

vishwatmaklokswamivarta

माय भारततर्फे ‘नशामुक्त युवा -विकसित भारत’ संकल्प अभियान उत्साहात संपन्न

शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; केंद्रीय मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांची प्रमुख उपस्थिती*

जिल्ह्यात नोंदणीविना कार्यरत दिव्यांग संस्थांवर होणार कारवाई३० नोव्हेंबर पर्यंत नोंदणी अनिवार्य — जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

खड्डयांमुळे अपघात झाल्यास मिळणार भरपाई*

vishwatmaklokswamivarta

हुंडा प्रतिबंधक कायद्याची माहिती देणाऱ्या घडीपुस्तिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन हुंडा दिला/घेतला नसल्याबाबत ११६७ कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र प्राप्त