vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

खड्डयांमुळे अपघात झाल्यास मिळणार भरपाई*

*खड्डयांमुळे अपघात झाल्यास मिळणार भरपाई*

सातारा, प्रतिनिधी : खड्डयांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिलेल्या आदेशानुसार, खड्डे किंवा उघड्या मॅनहोल्समुळे झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झाल्यास वारसांना ६ लाख रुपये, तर गंभीर दुखापत झाल्यास ५० हजार ते २.५ लाख रुपये इतकी भरपाई संबंधित प्राधिकरणाकडून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर यांनी दिली आहे.

भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए किंवा संबंधित प्राधिकरणांवर राहणार असून, ही रक्कम नंतर रस्त्यांच्या देखभालीतील त्रुटींसाठी जबाबदार ठरलेल्या कंत्राटदार किंवा अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात येईल. भरपाईची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भरपाई समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त, नगरपालिका / नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश निना बेदरकर यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. समितीकडून आलेल्या अर्जावर ६ ते ८ आठवड्यांत निर्णय घेण्यात येणार आहे. भरपाई रक्कम वेळेत न दिल्यास वार्षिक ९ टक्के व्याजासह नुकसानभरपाई देणे बंधनकारक राहील. तसेच दोषी ठरलेल्या कंत्राटदारांवर काळ्या यादीत टाकणे, दंड आकारणी आणि फौजदारी कारवाई करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

0000

संबंधित पोस्ट

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते साई राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (एनसीओइ) गांधीनगर येथे एकात्मिक क्रीडा पायाभूत सुविधांचे उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना

vishwatmaklokswamivarta

विमान अपघातातील प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष*

ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र प्राथमिक निवड, मुलाखत, शुध्दिपत्रक, मुलाखत वेळापत्रकाबाबत आवाहन  

शासकीय कर्करोग रुग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्रीचे उद्घाटन उपचार व दिलासादायक वागणूकीसाठी पुढाकार घ्या- पालकमंत्री शिरसाट