vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सातारा व दहिवडी येथील सरदार @ १५० युनिटी मार्च पदयात्रेमध्ये नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन*

*सातारा व दहिवडी येथील सरदार @ १५० युनिटी मार्च पदयात्रेमध्ये नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन*

 

सातारा, प्रतिनिधी: युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत २०२५ हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे, या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत. या उपक्रमात शाळा, महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना, माय भारत, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि बीएसजी युनिट्स यांची सहभागिता आहे. सातारा शहरातील पदयात्रेचे आयोजन १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता गांधी मैदान, राजवाडा येथे जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करून होणार आहे. पदयात्रेचा मार्ग गांधी मैदान, राजवाडा सुरु होऊन छ. शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा येथे समाप्त होणार आहे. पदयात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे.

दहिवडी शहरामध्ये पदयात्रेचा दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता दहिवडी कॉलेज दहिवडी परिसरातून शुभारंभ होऊन छ. शिवाजी महाराज चौक मार्गे – महात्मा गांधी विद्यालय समोरून बाजार पटांगण – गणेश मंदिर – सिद्धनाथ मंदिर परिसरापासून आलेल्या मार्गाने दहिवडी कॉलेज दहिवडी येथे समारोप होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि देशभक्तीची भावना निर्माण करणे असा आहे. , शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहभागाने भविष्यातील भारताच्या निर्मितीत तरुणाईचा सहभाग वाढविण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, नृत्य आणि प्रेरणादायी भाषणे या माध्यमातून देशभावना जोपासली जाईल. भविष्याला दिशा देणाऱ्या या पदयात्रेत तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विविध शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था, पोलिस कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी https://mybharat.gov.in/unity_march_registration/457137608457 संकेतस्थळ यावर खुली आहे.

0000

संबंधित पोस्ट

तपोवनातील लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे आधार सिडींग

सी.पी. राधाकृष्णन यांचा भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी संपन्न राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पदाची आणि गोपनीयतेची शपथ..

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलीआरगच्या बौद्ध विहार इमारतीची पाहणी…

म्हाडातर्फे सदनिकांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन26 सप्टेंबर रोजी लॉटरीची सोडत मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांची माहिती..

इतर मागास बहुजन कल्याण विभाग)विभागाच्या आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजना..

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात