vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

माधव अगस्ती यांची वेशभूषा क्षेत्रातील कारकीर्द प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘स्टिचिंग स्टारडम: फॉर आयकॉन्स, ऑन अँड ऑफस्क्रीन’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

माधव अगस्ती यांची वेशभूषा क्षेत्रातील कारकीर्द प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,स्टिचिंग स्टारडम: फॉर आयकॉन्स, ऑन अँड ऑफस्क्रीन’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

 

मुंबई, प्रतिनिधी: माधव अगस्ती यांनी आपल्या वेशभूषा क्षेत्रातील ५० वर्षांच्या कारकीर्दीत विविध नेते आणि अभिनेत्यांना वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा दिली. त्यांच्या वेशभूषेने प्रत्येकाच्या व्यक्तिरेखेला स्वतंत्र ओळख मिळाली असून अतिशय मेहनतीने या क्षेत्रात नाव कमावलेल्या अगस्ती यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

प्रसिद्ध वेशभूषाकार अगस्ती यांच्या कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या ‘स्टिचिंग स्टारडम : फॉर आयकॉन्स, ऑन अँड ऑफस्क्रीन’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एंड येथे झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अभिनेता अक्षय कुमार, चित्रपट निर्माते बोनी कपूर, माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांच्यासह चित्रपट आणि फॅशन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माधव अगस्ती यांनी भारतातील विविध शहरात काम केले. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात त्यांनी स्टायलिस्ट बनण्याचा घेतलेला निर्णय धाडसी होता, तथापि, अतिशय मेहनतीने काम करून त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला. यामुळेच आज देशातील मोजक्या स्टायलिस्टमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्राच्या बहुतांश मुख्यमंत्र्यांसाठी त्यांनी पोशाख डिझाईन केल्याची माहिती घेऊन मी स्वतः शपथविधीच्या वेळी माधव अगस्ती यांनी शिवलेले जॅकेट घातल्याची आठवणही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितली.केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, चित्रपट निर्माते बोनी कपूर, अभिनेता अक्षय कुमार, माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांनीही यावेळी माधव अगस्ती यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

संबंधित पोस्ट

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षण अंतिम, प्रारूप आरक्षणात कोणताही बदल नाही- उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे- विभागीय आयुक्त यांच्याकडून सर्व 73 आक्षेप नामंजूर 

vishwatmaklokswamivarta

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना; ३१ जुलै पर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

मुंबईसाठी यलो अलर्ट, पुणे आणि विदर्भात गडगडाटासह अवकाळी पाऊस;  हवामान खात्याचा अंदाज…

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta