vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार-कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे 

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार-कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

सातारा प्रतिनिधी-पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे ब्रिटिशकालीन आहे. या केंद्रामध्ये सोयी सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक असून केंद्राच्या बळकटीकरणासाठी व सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी फलटण तालुक्यातील पाडेगाव व संशोधन केंद्राला भेट देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे महासंचालक रावसाहेब बागडे, राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. साताप्पा खरबडे, मध्यवर्ती व संशोधन केंद्राचे ऊस विशेषतज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांच्यासह ऊस संशोधन केंद्रातील अधिकारी उपस्थित होते.

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने संशोधन करून नवनवीन उसाचे वाण विकसित केले आहे. या वाणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन झाले आहे. या संशोधन केंद्राचे देशात अत्यंत चांगले काम आहे. या केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा आराखडा शंभर वर्षाचा विचार करून तयार करावा. यामध्ये शेतकऱ्यांसाठी निवासी प्रशिक्षण सभागृह, निवासाची सोय, अत्याआधुनिक प्रयोगशाळा यासह विविध सोयी सुविधा उपलब्ध निर्माण कराव्यात. या कामासाठी निधीची अडचण वाचून देणार नाही अशी ग्वाही कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी दिली.

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने उसाच्या विविध वाण संशोधन करून विकसित करावे, शेतकऱ्यांना ऊस लागवडी बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करावे अशा सूचना करून कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, कृषी विभागाच्या योजना, विविध बियाणे, खते यांची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर होर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना सोपी व सहज शेती करण्यासाठी मार्गदर्शनाबरोबर सहकार्य शासनामार्फत करणार असल्याचेही कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे प्रभावीपणे करून जतचा विकास साधावा-खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी दरमहा ५०हजार रुपये देण्याचे उपमुख्यमंत्री यांचे आदेश !मंदिरासह सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराचा विकास करण्याची मागणी!

सौरऊर्जा प्रकल्पांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक हिस्सा कमी करण्याबाबत-समिती स्थापन करणार- मंत्री उदय सामंत

अतिदुर्गम भागात पोषण आहार व प्राथमिक आरोग्य सेवा३८ नवीन अंगणवाड्यांच्या माध्यमातून देणार- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

कौशल्य विकास विभागामार्फत “संविधान दिन” मार्गदर्शन शिबीर

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी नाव नोंदणी करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta