vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कौशल्य विकास विभागामार्फत “संविधान दिन” मार्गदर्शन शिबीर

कौशल्य विकास विभागामार्फत “संविधान दिन” मार्गदर्शन शिबीर

        सांगली, प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली कार्यालयातर्फे संविधान दिनानिमित्त श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली येथे संविधान दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले.

      या शिबीरासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख, श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल सुगते, अॅड. स्वप्ना देशपांडे व श्रीयश एज्युकेशन ट्रेनिंग सेंटरचे विठ्ठल एडके आदि मान्यवर उपस्थित होते.

या शिबीरामध्ये अॅड. स्वप्ना देशपांडे यांनी संविधान ओळख व जनजागृती या विषयावर मार्गदशन केले. विठ्ठल एडके यांनी व्यक्तिमत्त्व विकास व संभाषण कौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले. शिबीराची सुरुवात संविधानाची उद्देशिका वाचून व संविधान शपथ घेवून करण्यात आली. सूत्रसंचालन सुखदा कुलकर्णी यांनी केले. आभार सुनीता माळी यांनी मानले. शिबीरासाठी महाविद्यालयातील 204 युवती उपस्थित होत्या.

 

00000

संबंधित पोस्ट

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम-चित्ररथाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करा-वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनची मागणी…

vishwatmaklokswamivarta

लोकशाही सुदृढ करण्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

कुणबी जात प्रमाणपत्रःनागरिकांना मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन

दशसुत्रीची फलश्रुती; गदाना येथील विद्यार्थिनीच्या तोंडुन शिवरायांची थोरवी ऐकून भारावले जिल्हाधिकारी…

vishwatmaklokswamivarta