vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम-चित्ररथाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम-चित्ररथाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन

जालना प्रतिनिधी नांदेड येथे महाराष्ट्र शासनामार्फत येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाची जिल्ह्यातील शीख, सिकलीगर, बंजारा,लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील भगत नामदेव या नऊ समाजासह इतरही भाविकांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती व्हावी, यासाठी ‘हिंद-दी-चादर’ चित्ररथाचे (दि. 18 रोजी) मंगळ बाजार येथील गुरुद्वारा परिसरात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जगदीश सेवाराम, डॉ. आर.डी सचदेव, बाबाजी सर्वणसिंग, राजेश जांगडे, हितेश जोशी, गुलाब राठोड, श्यामजी सारस्वत, मोहित काडा, पंकज धनकाणी, करण सिंग भोंड, सिकंदर सिंग टाक, हरिनाम सिंग चव्हाण, संतोष सिंग कलाणी, ध्यानु सिंग टाक, ज्वाला सिंग कलाणी, रणजीत सिंग कलाणी, लल्लू सिंग कलाणी, जगदीश सुरी, सोनुसिंग रिहाण, दर्पण सिंग सुखमणी, बलजीत सिंग ढिल्लो, दिप सिंग कलाणी, जितूभाऊ गेही यांच्यासह समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, हा मुख्य उद्देश आहे. चित्ररथ जिल्ह्यातील वस्ती, तांड्यावर जावून ‘हिंद दी चादर’ या विशेष कार्यक्रमासाठी जास्तीत-जास्त भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

 

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पहाणी**वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा*- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसेसची संख्या वाढवावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· परिवहन सेवा सक्षम करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

मूल्य साखळी भागीदारीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी,सहकारी संस्थांनी अर्ज 

अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा यांनी गढवाल रायफल्स रेजिमेंटचे कर्नल म्हणून पदभार स्वीकारला

ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्त नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाची कारवाई; तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta