vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुंबई जिल्ह्यात ६८६ रुग्णांना सुमारे ६.५५ कोटींची मदत· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

मुंबई जिल्ह्यात ६८६ रुग्णांना सुमारे ६.५५ कोटींची मदत· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

मुंबई, प्रतिनिधी: शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. मुंबई जिल्ह्यात आर्थिक वर्षात ६८६ रुग्णांना सुमारे ०६ कोटी ५५ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.*२० गंभीर आजारासाठी मदत*कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

*सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.

*आर्थिक वर्षातील मदत*१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत मुंबई जिल्ह्यातील ६८६ रुग्णांना सुमारे ६ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे मुंबई जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वेळेत आर्थिक मदत मिळत आहे. जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि तातडीने निपटारा यामुळे मदत अधिक पारदर्शक व जलद झाली आहे. अधिक माहितीसाठी गरजू रुग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

मलकापूर शहरातील गणेशोत्सव मिरवणुक व विसर्जनाच्या कालावधीत वाहतूक मार्गात बदल; जिल्हाधिकारी यांचे आदेश

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंतीचा उत्सव समिती बुलढाणा..प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांची यावर्षी रेलचेल!

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला 30 प्रकल्पांचा आढावा ,वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्पउभारावेत, वॉररुमधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा, बीडीडी चाळ वासियांना लवकरच सदनिकांचे वाटप…

स्वयं पुनर्विकासच मुंबईचे चित्र बदलेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

एमएमआरडीएच्या  चेंबूर ते ठाणे दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या फ्री वे एक्स्टेंशनच्या कामात बाधीत होत असलेल्या १६९४ झोपडपट्टीधारकांपैकी चार झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत

vishwatmaklokswamivarta