vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यातील शाळा सकाळी 10 वाजेपर्यंतच भरणार

जिल्ह्यातील शाळा सकाळी 10 वाजेपर्यंतच भरणार

     अमरावती, प्रतिनिधी : विदर्भात वाढत असलेल्या तापमानाची तीव्रता आणि भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला उष्मालाटेचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत कपात करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा आता दहा वाजेपर्यंत भरणार आहेत.

    नव्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाडी आणि नर्सरी आता केवळ सकाळी 7 ते 10 या वेळेतच भरतील. हा आदेश 21 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत लागू राहील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सकाळी १० नंतरच्या उर्वरित तासिका ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. हा आदेश सर्व अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांसाठी बंधनकारक असेल.

   वाढत्या उष्म्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी हा खबरदारीचा उपाय योजण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत सकाळी 10 नंतर शाळा सुरू ठेवता येणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पुरेसे पाणी, सावलीची व्यवस्था आणि उष्मालाटेपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

000000

संबंधित पोस्ट

राजकीय पक्षांनी यादीभाग निहाय बीएलए यांची नेमणूक करावी — जिल्हाधिकारी किशन जावळे

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या बद्दल एकेरी व अपशब्द वापरल्यामुळे स्व स्वरूप संप्रदाय, जालना जिल्हा येथील भक्तगण सर्व भक्तगणांच्या तीव्र भावना दुखावल्या त्या विरोधात कारवाईची मागणी..

vishwatmaklokswamivarta

पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये*जिल्हाधिकारी संतोष पाटील*

राज्यातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळावे ही शासनाची भूमिका- राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांचा पुढाकार स्वतःचे गणना प्रपत्र भरून केले डिजिटायझेशन नागरिकांनाही विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

विमानतळ प्रांगणात बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना व लोकार्पण उत्साहात जनकल्याणासाठी सगळ्यांचा सहयोग आवश्यक-उद्योगमंत्री उदय सामंत