vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन…

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन…

 

जालना प्रतिनिधी: रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या आशीर्वादाने ४ ते १९ जानेवारी दरम्यान जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यातीलच एक सामजिक उपक्रम महारक्तदान शिबिर हे संपूर्ण भारतातमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे.जालना जिल्हा सेवा समितीच्या वतीने जालना जिल्ह्या मधील आठही तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेली आहे.दिनांक 5 जानेवारी रोजी काशीविश्वेश्वर महादेव मंदिर शिवाजी नगर जालना या ठिकाणी, ६ जानेवारी रोजी अंबड तालुक्यातील जामखेड या ठिकाणीदिनांक ९ जानेवारी या रोजी जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक या ठिकाणीदिनांक १० जानेवारी रोजी मंठा तालुक्यातील तळणी या ठिकाणीदिनांक ११ जानेवारी भोकरदन तालुक्यातील हसनाबाद या ठिकाणीदिनांक १२ जानेवारी घनसांवगी तालुक्यातील तीर्थपुरी या ठिकाणीदिनांक १३ जानेवारी बदनापूर तालुक्यातील दाभाडी या ठिकाणी दिनांक १५ जानेवारी परतुर तालुक्यातील परतुर या ठिकाणी दिनांक १६ जानेवारी जाफराबाद तालुक्यातील माहोरा या ठिकाणी दिनांक 18 जानेवारी भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव या ठिकाणी हे सर्व रक्तदान कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे तरी,स्व स्वरूप संप्रदाय जालना जिल्हा सेवा समितीच्या वतीने सर्व भक्त,शिष्य,साधक व मित्रपरिवार या सर्वांना या रक्तदानामध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

जावळी तालुक्यात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा

नीट युजी 2026 परीक्षा २१ जून रोजी पार पडणार असून, परीक्षा निष्पक्ष, सुरक्षित आणि सुरळीत वातावरणात घेण्यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे.

आताची मोठी बातमी -भाजप नेते आणि नंदीग्रामचे आमदार शुभेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या,  कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता चित्ररथ, संविधान जागृती बाईक रॅली उत्साहात संपन्न

इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत;**पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी डिजिटल शिक्षणाबाबत दिला प्रेरणादायी संदेश*

रोबोटिक बोयो” ठरतोय खऱ्या अर्थाने जीवनरक्षक..विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*