vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024ची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध-

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024ची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध-

 

ठाणे, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि.11 डिसेंबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या अंतरिम उत्तरसूचीवरील लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि.16 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दि.11 डिसेंबर 2024 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या अंतिम उत्तरसूचीनुसार महाटीईटी 2024 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याचीही संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी, असे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी कळविले आहे.00000

संबंधित पोस्ट

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार सामाजिक समता आणि न्यायाची प्रेरणा देणारे : मंत्री छगन भुजबळ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाज परिवर्तनासाठी प्रेरणादायी : मंत्री गिरीश महाजन

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या रिचलँड कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल…

vishwatmaklokswamivarta

वन्यजीव, पर्यावरण रक्षणासाठी कुंडल वन प्रबोधिनीकडून जनजागृती- मध्य प्रदेशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026’ चे पालन करून एकत्रित प्रयत्नांतून नवी मुंबईचे ‘देशातील सुपर स्वच्छ शहर मानांकन’ कायम राखण्याचा निर्धार

vishwatmaklokswamivarta

अनुकंपा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना हरकत/आक्षेप अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यात दुर्दैवी घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रिक्षा चालकाने  गतिमंद महिलेला मुंब्र्यातील अज्ञात स्थळी नेऊन बलात्कार, आरोपी अटक…