vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

श्री सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण प्रकल्पामुळे परिसराला मिळणार नवे रूप – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री सिद्धिविनायक मंदिर परिसर सुशोभीकरणाचे भूमिपूजन

श्री सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण प्रकल्पामुळे परिसराला मिळणार नवे रूप – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  श्री सिद्धिविनायक मंदिर परिसर सुशोभीकरणाचे भूमिपूजन

मुंबई, प्रतिनिधी: श्री सिद्धिविनायक मंदिरात देश विदेशातून भाविक येत असतात. भाविकांना सुलभ व कमी वेळामध्ये सिद्धिविनायकाचे दर्शन झाले पाहिजे. मंदिर परिसरात पायाभूत सुविधांची कामे करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून मंदिर परिसराचे सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराला नवे रूप मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला

श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरण पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन नंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) सदानंद शंकर सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, तसेच सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्यासह न्यासाचे विश्वस्त उपस्थित होते.

सुशोभीकरण प्रकल्पामुळे दररोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा आणि प्रसन्न वातावरण मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

संबंधित पोस्ट

दिवंगत पत्रकारांच्या नावे स्तंभ बनवा-विकासकुमार बागडी

महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी – पणन मंत्री जयकुमार रावल वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

इस्लामपूर येथे शनिवारी विधी साक्षरता, शासकीय योजनांचा महामेळावा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानपरिषद सभापती यांच्या दालनाचे उद्घाटन

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’विरुद्ध खोट्या तक्रारी करून बदनामी करणार्‍या‘सिटीझन फॉर जस्टीस ॲण्ड पीस’वर कारवाईची मागणी!अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून चौकशीचे आश्वासन!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांचा साठा ८८.४० टक्क्यांवर..