vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इस्लामपूर येथे शनिवारी विधी साक्षरता, शासकीय योजनांचा महामेळावा

इस्लामपूर येथे शनिवारी विधी साक्षरता, शासकीय योजनांचा महामेळावा

 

        सांगली, प्रतिनिधी: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 11 जानेवारी रोजी इस्लामपूर येथे विधी साक्षरता व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे संयुक्त आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष प्रदीप शर्मा यांनी केले आहे. हा महामेळावा दि. 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता श्री सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉल, इस्लामपूर येथे होणार आहे.

   या महामेळाव्याचे उद्‌घाटन उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती श्रीमती भारती डांगरे व अभय आहुजा यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष प्रदीप शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 या महामेळाव्यात विविध शासकीय कार्यालयांचे एकूण 30 स्टॉल मांडण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालयाचे अधिकारी/प्रतिनिधी प्रत्येक स्टॉलवर त्यांच्या विभागांतर्गत योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच या महामेळाव्यात विविध शासकीय योजनांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. तसेच, प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थींना योजनांचा लाभ मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तरी महामेळाव्याचा विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घ्यावा, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.00000

संबंधित पोस्ट

नाशिक शहरासाठी दाखल झालेल्या ५० ई-बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार-राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यात शिवसेनेचा नवा चेहरा डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर दुहेरी जबाबदारी..शिवसेना पक्ष संघटनेतील महत्वाच्या पक्ष सचिव पदा सह सहमुख्य संपर्क प्रमुख मराठवाडा (नांदेड आणि हिंगोली जिल्हा शिवसेना पक्षसंघटना) नियुक्ती करून मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा पुन्हा विश्वास

शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी, लावण्यासाठी सस्ती अदालत उपक्रम राबविणार- विभागीय आयुक्त दिलीप गावडे*“संवाद मराठवाड्याशी” उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्तांचा थेट शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद**शिव रस्ते, पाणंद रस्ते याबाबत आठही जिल्हयातील शेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी*Ø *तालुका पातळीवर दर पंधरवाड्याला सस्ती अदालत घेण्याचे निर्देश *

vishwatmaklokswamivarta

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन 

vishwatmaklokswamivarta

आजपासून रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ, वाचा नवे दर

vishwatmaklokswamivarta