vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ग्यानबा तुकाराम.. आश्वासनातले किती झाले काम..? असे म्हणत जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी विचारला सत्ताधार्‍यांना सवाल-भाऊ आणि दादा क्या हुआ तुम्हारा वादा..शिवसेनेच्या घोषणेने परिसर दणाणला..

ग्यानबा तुकाराम.. आश्वासनातले किती झाले काम..? असे म्हणत जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी विचारला सत्ताधार्‍यांना सवाल-भाऊ आणि दादा क्या हुआ तुम्हारा वादा..शिवसेनेच्या घोषणेने परिसर दणाणला..

जालना,  (प्रतिनिधी)- जालना येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात शिवसैनिकांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ग्यानबा तुकाराम.. आश्वासनांचे किती झाले काम.? व भाऊ आणि दादा क्या हुआ तुम्हारा वादा.. असे म्हणत सत्ताधारी पक्षाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या शेकडो पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकत्र येऊन जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात जाब विचारला.यावेळी उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, बाबुराव पवार, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले,युवा सेनेचे भरत सांबरे, माजी नगरसेवक जे.के.चव्हाण, गंगुताई वानखेडे,संदीप नाईकवाडे, माजी जि.प.सदस्य बबनराव खरात, दलित आघाडीचे जिल्हासंघटक रविकांत जगधने यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे निवेदन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी आमदार खोतकर यांच्यासमोर निवडणूक

काळात महायुतीच्या तिन्ही पक्षांनी दिलेली शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देणार, सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये देणार, लाडक्या बहिणींनाएकवीसशे रुपये देणार, ४४ हजार गावात पानंद रस्ते बांधणार, शेतकर्‍यांच्या खते बियाणे यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवणार,त्यावरील एसजीएसटी अनुदान स्वरूपात वापस देणार, एक रुपयात पिक विमा देणार, वृद्धांना पेन्शन स्वरूपात २१ रुपये देणार, अन्नदात्याला ऊर्जात आता बनवून २४ तास वीज देणार,शेतमालाला हमीभाव देणार, हर घर जल हर घर छत देणार, मराठवाडा वॉटर ग्रीडला केंद्राकडून मान्यता घेणार अशा दिलेल्या विविध आश्वासनांचा पाढाच त्यांच्यासमोर वाचून ‘क्या हुआ तेरा वादा..? असा सवाल केला.पुढे बोलताना भास्करराव अंबेकर म्हणाले की, मराठवाडा ही संतांची भूमी आहे संतांनी दिलेल्या वचनाप्रमाणे त्या काळातील राज्यकर्त्यांनी कारभार केला व जनतेला सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आज मात्र असे होताना दिसत नाही निवडणुका आल्यानंतर येथील जनतेला शेतकर्‍यांना भरपूर आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. संतांनी सांगितल्याप्रमाने बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, कांदा मुळा भाजीअवघी विठाबाई माझी.. अशा अभंगांचे दाखले देऊन टाळ मृदुंगाच्या गजरात

आणलेल्या या मोर्चाचे महत्त्व विशद करून शेतकर्‍यांच्या मागण्याशासनापर्यंत पोहोचविण्याची विनंती केली. यावेळी उपस्थितपदाधिकार्‍यांच्या हातात शेतकर्‍यांच्या मागण्यांचे फलक होते.यावेळी वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ.राजेश राऊत, महिला आघाडीच्या प्रमुखमंगल मेटकर, मंजुषा घायाळ, तालुका संघटक बाबुराव कायंदे, शहरअल्पसंख्यांक आघाडीचे प्रमुख वसीम पठाण यांच्यासह उपतालुका प्रमुखप्रभाकर उगले, उपशहरप्रमुख किशोर नरवडे, अजय रोडिया, विभागप्रमुख प्रभाकरघडलिंग, जनार्दन गिराम, शंकर जाधव, दलित आघाडीचे बाबासाहेब पाखरे, हरिभाऊ शेळके, युवा सेना तालुकाप्रमुख संदीप मगर, युवासेना शहरप्रमुख सुदर्शनचौधरी, विष्णुपंत गिराम, परमेश्वर डोंगरे,गणेश लाहोटी, दिलीपराव डोंगरे,सखावत पठाण, संतोष क्षत्रिय,संतोष खरात, राजू वैद्य, संतोष जमदडे, योगेशजाधव, तुकाराम भुतेकर,संजय गिराम,ऋषिकेश खिरे, स्वराज बोर्डे, प्रभाकरखरात,नंदु मतकर, जान मो.कुरेशी, गंगुताई वानखेडे, संदीप झारखंडे, निखिलघारेगावकर, किरण तुम्मा,जीवन खंडागळे, महादेव कावळे, श्याम कुलथे, रमेश

तुंगेवार, शुभम गायकवाड, रामेश्वर कुरील यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

०००००००

संबंधित पोस्ट

आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, महिला सक्षमीकरणातूनच शेतीचे भविष्य उज्ज्वल – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील,नेमाने इस्टेट येथे ५ ते ९ फेब्रुवारी कालावधीत कृषीपर्व महोत्सव

vishwatmaklokswamivarta

भाजपा सक्रीय सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात..

vishwatmaklokswamivarta

महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर द्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन-राबविण्यास राज्य शासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

मराठी येत नसल्यास रिक्षा चालकांचे परवाने रद्द करणार,बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई  ओला, उबर आणि रॅपिडो यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती,गायमुख ते छत्रपती शिवाजी चौक मेट्रो-१० प्रकल्पाला गती— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

भरपावसात पावनखिंडीत इतिहासाचा जागर; हिंदु जनजागृती समितीतर्फे ‘पावनखिंड मोहीम’ उत्साहात*नरवीर बाजीप्रभू देशपांडे व नरवीर शिवा काशीद यांच्या वंशजांची उपस्थिती*