vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार जाहीर

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार जाहीर

[मुंबई : प्रतिनिधी-

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार संपादक प्रकाश कुलकर्णी, विद्याधर दाते, सुरज सावंत, काशिनाथ म्हादे, प्रदीप धिवार, शिवराम मांजरेकर यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. पुरस्कारांचे यंदाचे ३५ वे वर्ष आहे.

ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, योगेश बिडवई आणि अभिजित मुळे यांच्या पुरस्कार समितीने या पुरस्कारांची निवड केली. रोख रुपये दहा हजार, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असेल, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली. शनिवार, दिनांक २१ जून, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणार्‍या पत्रकार संघाच्या ८४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या समारंभास इंडिया टुडे वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई हे महनीय प्रवक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या समारंभात वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेले पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य यांना पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्यत्व आणि सन्माननीय सहसदस्यत्व दिले जाणार आहे. हा समारंभ पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई ४०० ००१ येथे संपन्न होईल.

पुरस्काराचे यंदाचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत :शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा ‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती पुरस्कार’ : श्री. सूरज सावंत/श्री. काशिनाथ म्हादे (विभागून).वृत्तपत्रात काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रितशोधकास दिला जाणारा ‘कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर’ पुरस्कार :श्री. शिवराम मांजरेकर.सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा ‘समतानंद अनंत हरि गद्रे’ पुरस्कार : श्री. प्रकाश कुलकर्णीवृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा ‘अड. अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार’ पुरस्कार : श्री. प्रदीप धिवारज्येष्ठ पत्रकार/संपादकास दिला जाणारा ‘युगारंभकार, सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार’ : श्री. विद्याधर date आदींचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा आनंदी अय्यर यांना पुरस्कार 

महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – डॉ.राजेश गवांदे आंतरराष्ट्रीय डिजिटल दंतचिकित्सा काँग्रेस २०२६ अंतर्गत उद्योग गोलमेज परिषद

वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्र या अभिनव प्रकल्पाचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले राष्ट्रीय परिषदेत प्रभावी सादरीकरण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

भारताच्या डिजिटल कौशल्य मोहिमेला गती देण्यासाठी “बढना है तो यहाँ जुडना है” या देशव्यापी मोहिमेचा, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी ‘एस आय डी एच’ या कौशल्य भारत डिजिटल केंद्राच्या माध्यमातून केला शुभारंभ

रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयांच्या विकासाला गती – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर