vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियान….

जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियान….

 

राज्य प्रतिनिधी -रायगड जिल्ह्यात १ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात लोकसहभागातून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियानाचा शुभारंभ १ मे रोजी करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत गट विकास अधिकारी हे पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायत अधिकारी यांची कार्यशाळा व बैठक घेतील. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामस्थांना माहिती देतील. तसेच गावात दवंडी दिली जाईल. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय येथे सूचना फलकावर माहिती प्रसारित करण्यात येईल.‌ १ मे ते १० मे या कालावधीत गावातून संकलित केलेला ओला कचरा कंपोस्ट खड्ड्यात भरण्यात येईल. त्यापासून खत निर्मिती नंतर १५ सप्टेंबर पर्यंत कंपोस्ट खड्ड्यात तयार झालेले खत उपसण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

कंपोस्ट खड्ड्यांची पडताळणी करण्यासाठी जिल्हा स्तर तसेच तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे यांचा सहभाग घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

000

संबंधित पोस्ट

रिपब्लिकन पक्षाचे साहित्यिकांशी विचारमंथन ~ केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर बैठकीत सविस्तर चर्चा  धर्मनिरपेक्षता व शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा महत्त्वाचा : अरविंद चव्हाण 

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या-  योजनेचा लाभ मिळण्याकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत 

नसरापूर हत्या प्रकरणाच्या निकालावर उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेख मुकरम यांच्या हस्ते बालाजी सोनटक्के यांचा सत्कार

गोविंदनगर येथील वै. ह.भ.प. व्यंकटराव तिरुमली महाराज यांचा 6 वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पडला पार… 🎊🙇🏻‍♂️