vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लातूरमध्ये ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल’ मोहिमेचे आयोजन

लातूरमध्ये ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल’ मोहिमेचे आयोजन

लातूर, प्रतिनिधी: भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाद्वारे ‘खेलो इंडिया’ योजनेच्या ‘फिट इंडिया’ उपक्रमांतर्गत रविवार, ७ जून २०२६ रोजी लातूर शहरात ‘संडे ऑन सायकल’ या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये तंदुरुस्ती व नियमित व्यायामाचे महत्त्व रुजवण्यासाठी तसेच लठ्ठपणाशी लढण्यासाठी आयोजित केलेल्या या सायकल रॅलीचा मार्ग जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरू होऊन राजीव गांधी चौक, वाडा हॉटेल, पी.व्ही.आर. चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल असा निश्चित करण्यात आला आहे.

तरी या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी, नागरिक, सायकलिंग क्लब, शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि खेळाडूंनी ७ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ७ वाजता मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि या उपक्रमासाठी https://fitindia.gov.in/world-bicycle-day या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन लातूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

जालना शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबीर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबीरास प्रारंभ०७ फेब्रुवारी पर्यंत राहणार शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

गोसेवा आयोग पुरस्कारासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी- प्रकल्प अधिकारी हर्षिता भटनागर