vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

चांडोळ व शेळगाव आटोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

चांडोळ व शेळगाव आटोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट…

आरोग्य प्रतिनिधी-बुलढाणा, : चिखली तालुकाअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र चांडोळ व प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव आटोळ येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी मंगळवारी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

या भेटीदरम्यान डॉ. गिते यांनी दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामधील ऑपरेशन थिएटर (शस्त्रक्रिया कक्ष), डिलिव्हरी रूम, वॉर्ड, लसीकरण कक्ष आदी विभागांची सविस्तर तपासणी करून संपूर्ण कामकाजाचा आढावा घेतला. तसेच कुटुंब कल्याण, एनसीडी, निक्षय, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करत डेटा एन्ट्री वेळेत व अचूक करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सध्या सुरु असलेल्या सिकलसेल सप्ताह प्रभावीपणे राबविण्याबाबत सुचनाही दिल्या. यासोबतच आरोग्य विषयक निर्देशांक वाढविण्यासाठी सेवा गुणवत्तेवर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले

यावेळी चांडोळ येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तर शेळगाव आटोळ येथे डॉ. वायाळ, डॉ. पैठणे, डॉ. राजपूत व इतर सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते

000

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सहायता कक्षातून 24 तासात होते मदत उपलब्ध रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया…

विधान परिषद-: प्रश्नोत्तरे सचिन होले यांना पाणी पुरवठा योजनेची कामे नाहीत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,सचिन होले यांना दिलेल्या वर्ग-५ स्थापत्य प्रमाणपत्र प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

मानसिक आरोग्य कायद्याचा लाभ रुग्णांना द्या : न्या. जाधव

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १४ वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम९ मार्चपासून सुरुवात

शहरी आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनची व्यापक पावले; नागरिकांना घराजवळ दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्यात स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारणीला गती — जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने अंमलबजावणीचे आदेश

vishwatmaklokswamivarta