vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

महसूल सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिरात दीडशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी…

महसूल सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिरात दीडशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी…

    सांगली, प्रतिनिधी : महसूल सप्ताहानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात १५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.महसूल सप्ताह दिनांक 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे मार्गदर्शन व निर्देशानुसार हे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्या उपस्थितीमध्ये तीन महिला महसूल सहाय्यक यांच्या आरोग्य तपासणीचा शुभारंभ करून करण्यात आले

 यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री शिवाजी जगताप, राजीव शिंदे, विवेक काळे, रघुनाथ पोटे, तहसीलदार, नायब तहसीलदार आदि उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात डॉ. परमेश्वर तसेच त्यांच्या पथकामार्फत तपासणी करण्यात आली. यावेळी रक्ताचे नमुने, ईसीजी, नेत्र तपासणी, गायनॅकॉलॉजी संदर्भात तसेच ऑर्थोपेडिक व जनरल फिजिशियन यांच्यामार्फत एकूण 151 अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 45 महिला व 106 पुरूष अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सिनर्जी, सेवासदन, कल्लोळी, सुदर्शन नेत्र रूग्णालय या रूग्णालयांमार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली

     या आरोग्य शिबिरात एकूण ईसीजी नोंदणी 98, रक्त तपासणी 151, डेंटल 33, ऑप्थल 90, ऑर्थोपेडिक 45 व मेडिसीन तपासणी 110 अधिकारी व कर्मचाऱ्यांची करण्यात आली.

या तपासणीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली, आरबीएसके टीम, Tricog ईसीजी टीम मधून उदय कदम, अनिरूध्द कारंजे, विशाल जाधव, डॉ. केदार पाटील (Dentist), डॉ. परशुराम हरणे, जिल्हा कार्यक्रम समन्वये यांच्या नेतृत्वामध्ये आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.  या आरोग्य शिबिरास सहायक महसूल अधिकारी, महसूल सहायक, वाहन चालक, शिपाई व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

गोटपॉक्स लसीकरण : पहिल्या टप्प्यात ३७.५२ लाख लसमात्रांचे वाटप सुरू मोहीम गतिमान करण्याचे आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील 

कुष्ठरुग्ण शोध अभियान…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात विशेष मोहिमांना गती

इ संजीवनी ओपीडी’द्वारे १ लाख ७४ हजार रुग्णांना मिळाली सेवा

vishwatmaklokswamivarta

भारताने पहिले स्वदेशी प्रतिजैविक “नॅफिथ्रोमायसिन” विकसित केले, जे प्रतिरोधक श्वसन संसर्गाविरुद्ध प्रभावी आहे, विशेषतः कर्करोग आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी केली आरोग्य तपासणी आणि साहित्य नोंदणी; लवकरच होणार साहित्य वाटप शिबीर