मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक अर्थात कनेक्टिंग लिंक मार्गावर सुरक्षित वाहतूक आणि अपघातांना आळा घालण्यासाठी राज्याचे वाहतूक विभागाचे नवीन वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. हे नियम १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणार

मुंबई प्रतिनिधी-मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक अर्थात कनेक्टिंग लिंक मार्गावर सुरक्षित वाहतूक आणि अपघातांना आळा घालण्यासाठी राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी नवीन वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. हे नियम १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणार आहेत.
या अधिसूचनेनुसार, मिसिंग लिंक मार्गावर खासगी कार आणि अन्य हलक्या मोटार वाहनांना प्रवेश दिला जाणार असून, त्यांच्यासाठी ताशी १०० किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रवासी बस आणि इतर प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किलोमीटर वेगमर्यादा असेल.
मिसिंग लिंक मार्गावर सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय, ज्वलनशील, स्फोटक किंवा अन्य धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या मार्गावर प्रवेश करता येणार नाही. यासाठी जुन्या द्रुतगती महामार्गाचा वापर करावा, असं आवाहन महामार्ग पोलिसांनी केलं आहे.