vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

ठाणे, प्रतिनिधी-  पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेचा अर्ज पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारेच दि.20जुलै 2025 पासून दि.20 ऑगस्ट 2025 पर्यंत स्वीकारण्यात येणार असून अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येतील.

ही स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तांसाठी केलेल्या सोयीसुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत त्यानुषंगाने प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.

दि.27 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे हे 4 जिल्हे प्रत्येकी 3 आणि हे 4 जिल्हे वगळता अन्य 32 अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण 44 शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अड.आशिष शेलार यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

मुंब्रा विभागतील शेअर ए रिक्षा चे सुधारित दर

जिल्ह्यामध्ये दि.१४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व जिल्हाधिकारी रायगड यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय अडचणी, तक्रारी आणि प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांविषयी शासन संवदेनशील*  *येणारा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावा**- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

तहसीलदार रंगनाथ मेंडके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

महाराष्ट्र भूषण राम सुतार श्रद्धांजली सभेचे उद्या दिल्लीत आयोजन

vishwatmaklokswamivarta