vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेलूद येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची 31 वी सभा संपन्न

शेलूद येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची 31 वी सभा संपन्न

बुलडाणा, प्रतिनिधी : येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची 31 वी सभा मौजे शेलूद येथे प्रगतशील शेतकरी स्वप्नील महाजन यांच्या शेतावर पार पडली. सभामध्ये शून्य मशागत तंत्रज्ञानाचे महत्त्व, जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे संवर्धन, पिक लागवड खर्चात बचत, जमिनीची धूप रोखणे आणि पर्यावरण संतुलन याविषयी शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. दीपक जोशी यांनी शून्य मशागत तंत्रज्ञानामुळे सेंद्रिय कर्ब वाढून शेती उत्पन्नात भर पडते, असे सांगितले.

 

कार्यक्रमात खरीपातील कीड-रोग नियंत्रणावर शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद झाला व प्रक्षेत्र भेटही घेण्यात आली. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. अमोल झापे, उद्यानविद्या तज्ञ डॉ. अनिल तारू, कृषी हवामान तज्ञ मनेश यदुलवार, दीपक काका जोशी, श्याम गट्टाणी, डॉ. बी. आर. पाटील, माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ कापूस संशोधन, तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनेश यदुलवार यांनी केले.

000000

संबंधित पोस्ट

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ : प्रतीक्षाधीन यादीतील दुसऱ्या फेरीस प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा-शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श घेऊन शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावीसाठी कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध राहावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेडच्या एकाच अपिलार्थीचे 81 अपील राज्य माहिती आयोगाने फेटाळले19 अपिलार्थींचे 7 हजार 567 व्दितीय अपील फेटाळले

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारी ग्रुपच्या 10 गिगावॅट इंटिग्रेटेड सोलर इंगॉट अँड वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचे भूमिपूजन. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित

कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) आस्थापनांना नियमावली जारी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक…

vishwatmaklokswamivarta