vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैध एलपीजी गॅस वापर उघड; चेंबूर–देवनार येथे दोन गुन्हे नोंद

डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैध एलपीजी गॅस वापर उघड; चेंबूर–देवनार येथे दोन गुन्हे नोंद

मुंबई, प्रतिनिधी : शहरातील एलपीजी गॅसच्या काळ्याबाजारावर आळा घालण्यासाठी नागरी पुरवठा विभागाने १८ एप्रिल रोजी राबविलेल्या विशेष धाड मोहिमेत डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैधरित्या एलपीजी गॅसचा वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या कारवाईत चेंबुर आणि अनुशक्तीनगर (देवनार) परिसरात दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई चंद्रकांत डांगे यांच्या निर्देशानुसार, उपनियंत्रक शिधावाटप ‘ई’ परिमंडळ श्रीमती रिना बसैय्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक नियंत्रक शिधावाटप रामकृष्ण कांबळे यांच्या अधिपत्याखालील पथकाने ही कारवाई केली. एलपीजी गॅसचा काळाबाजार व अनियमितता रोखण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.

चेंबुरमधील कारवाई,चेंबूर परिसरातील पेस्तमसागर रोडवरील विश्वसंगम टॉवरमधील डॉमिनोज पिझ्झा सेंटरवर धाड टाकण्यात आली. शिधावाटप कार्यालय क्र. ३३ ‘ई’ चेंबुर येथील सहाय्यक शिधावाटप अधिकारी जितेंद्र देशमुख, अमर सकपाळ तसेच निरीक्षक भगवान वांडेकर, निलकंठ येसने आणि प्रकाश पराते यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासादरम्यान एकूण ८ एलपीजी सिलेंडर्स विनाबिल अवैधरित्या प्राप्त करून वापरत असल्याचे आढळले. या प्रकरणी सुमारे २५,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टिळकनगर (चेंबूर) पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवनारमधील कारवाई  देवनार परिसरातील अर्जुन सेंटर येथील डॉमिनोज पिझ्झा सेंटरवरही धाड टाकण्यात आली. शिधावाटप कार्यालय क्र. ४९ ‘ई’ अनुशक्तीनगर येथील शिधावाटप अधिकारी जगन्नाथ सानप, सहाय्यक अधिकारी श्रीमती सोनाली धांदरणेकर तसेच निरीक्षक देवयानी पवार, नंदिनी इंगोले, राकेश पाटील आणि सुनील आढाऊकर यांच्या पथकाने कारवाई केली. येथे एकूण १९ एलपीजी सिलेंडर्स विनाबिल वापरात असल्याचे आढळून आले. सुमारे ४९,११७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोवंडी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काळाबाजाराविरोधात कारवाई तीव्र,नागरी पुरवठा विभागाकडून एलपीजी गॅसच्या बेकायदेशीर साठवणूक व वापराविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.

000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू,मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित    सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या डिजिटल डॅशबोर्डचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

शिक्षक पात्रता परीक्षा वेळापत्रक जाहीरपनवेल शहरातील एकूण 6 केंद्रांवर घेण्यात येणार परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

अनंत चतुर्दशी दिनी होणा-या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुव्यवस्थित नियोजन

vishwatmaklokswamivarta

परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरातील घटनेबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले 

ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार