vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

राज्य प्रतिनिधी

आगामी २३ एप्रिल रोजी होणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त खर्च निरीक्षक बनोत अखिल रामनाईक यांनी उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी आज पूर्ण केली.

या पोटनिवडणुकीत एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, निवडणूक कालावधीत त्यांच्या खर्चाची एकूण तीन टप्प्यांत तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार पहिली तपासणी १३ एप्रिल रोजी पार पडली होती, तर दुसरी तपासणी १७ एप्रिल रोजी पूर्ण झाली आहे. तिसरी आणि अंतिम तपासणी २१ एप्रिल रोजी होणार आहे.

 

आज झालेल्या तपासणीदरम्यान २३ पैकी २२ उमेदवारांनी आतापर्यंतचा दैनंदिन निवडणूक खर्चाचा अहवाल खर्च निरीक्षकांकडे सादर केला. सादर करण्यात आलेल्या खर्चाच्या नोंदींची सखोल पडताळणी करण्यात आली. यावेळी सहाय्यक खर्च निरीक्षक सुरेंद्र वाघमारे, संजय शेलार, खर्च पथक प्रमुख तुषार मोरे, व्हिडिओ व्हिजिलन्स टीम (VVT) प्रमुख श्री. लोदडे तसेच खर्च पथकातील सदस्य अशोक शिरतोडे, स्वप्नील आपुणे, स्वाती दराडे, अक्षय मांडवे, प्राची सपकाळ आणि सागर जगताप उपस्थित होते.

 

यावेळी निरीक्षक रामनाईक यांनी अकाउंटिंग, व्हिडिओ व्हिजिलन्स टीम (VVT), व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम (VST) तसेच तक्रार निवारण पथक यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

संबंधित पोस्ट

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू, जिंतूर येथे नैसर्गिक आपत्तीचा घेतला आढावा नुकसानीचे जलदगतीने पंचनामे करण्याचे निर्देश; रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा सुरळीत करावा, आपत्ती टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे

vishwatmaklokswamivarta

कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन : ‘संयुग ७’ची प्रभावी कामगिरी – डॉ. श्रीकांत माने

vishwatmaklokswamivarta

17 नोव्हेंबरला महिला लोकशाही दिनाचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी, पूर परिस्थितीत; मदत व बचाव कार्यास सर्वोच्च प्राधान्य,जिल्हा प्रशासनास तातडीने मदत; साधनसामग्री उपलब्ध नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिंद-की-चादर” कार्यक्रमानिमित्त नांदेड तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना २४ जानेवारी रोजी #सुट्टी जाहीर       #परीक्षा सुरू असलेल्या ठिकाणी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद प्रश्नोत्तरे :दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये अनियमितता प्रकरणी चौकशी नंतर योग्य ती कारवाई – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे