vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

मुंबई, प्रतिनिधी-राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाने “एकल महिला धोरण” तयार करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या , राज्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित तसेच एकट्याने संसाराचा भार सांभाळणाऱ्या महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला व बाल विकास विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केली असल्याचे श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेनुसार या धोरणासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याच्या आधारे सक्षमीकरणासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या समितीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचविणार आहे.

“राज्यातील एकल महिलांना सन्मानाने जगता यावे, त्यांना शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. हे धोरण महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.” समितीचे कामकाज व समन्वय महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे ही श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

 

००००

संबंधित पोस्ट

रस्ता सुरक्षा अभियान संयमाने वाहन चालविणे हीच खरी हिरोगिरी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

प्रशासनाने ‘रेग्युलेटरी’ नव्हे तर ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे; प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा गुरनोलीत ग्रामस्थांशी थेट संवाद

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ हेल्पलाइन· मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध..

vishwatmaklokswamivarta

वृक्ष लागवड मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा* 🌳

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

vishwatmaklokswamivarta

उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज -आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन नागपुरात ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था’ (एसआयडीएम)