vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

निझर्णेश्वर मंदिर देवस्थान संगमनेर तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र होणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

निझर्णेश्वर मंदिर देवस्थान संगमनेर तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र होणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी , प्रतिनिधी :- श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराचा सुरू झालेला जीर्णोद्धार आणि परिसरात प्रस्तावित बिबट सफारी प्रकल्प यामुळे हे देवस्थान तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार अमोल खताळ, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, वनविभागाचे अधिकारी अमरजित पवार, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, कैलास तांबे तसेच मंदिर विश्वस्त समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र या कामात लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. उपलब्ध करून दिलेल्या विकास निधीमुळे परिसराचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले असून, जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यानंतर या तीर्थक्षेत्राची भव्यता अधिक वृद्धिंगत होईल.

तसेच, वनविभागाच्या जागेवर प्रस्तावित बिबट सफारी प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला असून, राजस्थानमधील व्याघ्र प्रकल्पांच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या प्रकल्पामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

आमदार श्री. खताळ म्हणाले, शासनाच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. या विकास प्रक्रियेत पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. देवस्थानांच्या विकासासाठी मिळणाऱ्या निधीमुळे तीर्थक्षेत्र पर्यटनाला गती मिळत असून, भविष्यात हा परिसर विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

संबंधित पोस्ट

महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादन विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

कर्जत – जामखेड मतदारसंघातील १३ वस्त्यांना“वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने” अंतर्गत१०० लाख रुपयांचा निधी मंजूर,विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

इलेक्ट्रिक ट्रक’ निर्मितीसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला

vishwatmaklokswamivarta

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न..

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती.