vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कराड येथील ईदगाह मैदानाच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ – पालकमंत्री शंभूराज देसाई

कराड येथील ईदगाह मैदानाच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी: कराड येथील ईदगाह मैदान येथे दफण विधी, रमजान ईद व बकरी ईद निमित्त सार्वजनिक नमाज पठण करण्यासाठी अडचणी येत आहेत, असे सांगून ईदगाह ट्रस्टच्या सदस्यांनी केलेल्या मागण्यांबद्दल सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

कराड येथील ईदगाह जमिनी संदर्भात पालकमंत्री कार्यालयात पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षकांनी जागेची पहाणी करावी. कोणाचीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, तेथील रस्ता नगर परिषदेमार्फत तयार करण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.सोलर हायमास्ट दिवे बसविण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करा – पालकमंत्री शंभूराज देसाईपाटण तालुक्यातील नाडे, सांगवड, चोपदारवाडी, गव्हाणवाडी व मरळी या रस्त्यांवर सोलर हायमास्टर दिवे बसविण्यात येणार आहे. याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

सोलर पॅनलसाठी जिल्हा नियोजन व दिव्यांसाठी नाविन्यपूर्ण योजनेतू निधी उपलब्ध करुन दिला जाईल. सोलर पॅनेल हे सार्वजनिक इमारतींवर बसवावे. या कामासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. हे काम करीत असताना गुणवत्ता व दर्जा चांगला राहिला पाहिजे, अशाही सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

0000

संबंधित पोस्ट

जावळी तालुक्यात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने कर्ज वाटप, स्वयंरोजगार मेळाव्याचे 30 एप्रिल रोजी आयोजन 

vishwatmaklokswamivarta

सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या प्रशस्त घरांची होणार स्वप्नपूर्ती- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभादेवी परिसरातील सहा पुनर्विकासाच्या कामांची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta