vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

22 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

22 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

     नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत बुधवार दिनांक 22/04/2026 रोजी सी. बी. डी. सेक्टर-28 पंप हाऊस येथे मॅनिफोल्ड व व्हॉल बसविणे तसेच कळंबोली सर्कल, नेरुळ सेक्टर-19 वंडरपार्क येथील जलवाहिनीवर व्हॉल बसविण्याची कामे हाती घेण्यात येणार आहे. तसेच घणसोली से-2 येथील 900 मी.मी. व्यासाची पाईपलाईन जोडण्याच्या कामासाठी जलवाहिनीवरील पाणी पुरवठा हा बुधवार दि.22/04/2026 रोजी बंद राहणार आहे.

          त्यासाठी बुधवार दि. 22/04/2026 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत 12 तासांकरीता मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

          त्यामुळे सदर कालावधीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे बुधवार दि. 22/04/2026 रोजी संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व गुरुवार दि. 23/04/2026 रोजी सकाळचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.

          तरी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे

00000

संबंधित पोस्ट

महावीर जयंतीला कत्तलखाने, मांसविक्री बंद

पी. एम. किसान योजना: सर्व लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी वार्षिक ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक; कृषी विभागाचे आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जलसंपदा विभागाच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन

केंद्राकडे प्रलंबित असलेला रोजगार हमी योजनेचा निधी राज्यास तत्काळ मंजूर करावा- : रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025निवडणूक प्रचार व प्रसिद्धीकरिता वापरण्यात येणाऱ्यावस्तू व सेवांचे दर निश्चितीबाबत आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम