vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक व्हा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- एनएसएसच्या विद्यार्थ्यांना कृषि उद्योग दूतचे प्रशिक्षण 

कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक व्हा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- एनएसएसच्या विद्यार्थ्यांना कृषि उद्योग दूतचे प्रशिक्षण

सांगली, द प्रतिनिधी : तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन उद्योगाकडे वळावे आणि यशस्वी उद्योजक व्हावे. विद्यार्थी दशेमध्येच उद्योग व्यवसायाचा विचार केला तर एखादा यशस्वी उद्योजक निर्माण होऊ शकतो. त्यासाठी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना कृषि व उद्योग विभागाकडील विविध योजना व त्याबाबत तज्ज्ञांकडून व यशस्वी उद्योजकांकडून प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.

एन.एस.एस. विद्यार्थी यांना कृषि उद्योग दूतचे प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कृषि विभाग व उद्योग भवन यांचेकडील विविध योजना व त्यांच्या लाभाबाबत तज्ज्ञ प्रशिक्षक व यशस्वी उद्योजकामार्फत जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले. नियोजन समिती सभागृह येथे आयोजित या प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, कृषि उपसंचालक धनाजी पाटील, जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे, एन.एस.एस.योजना जिल्हा समन्वयक श्री. किर्दत, सहाय्यक महसूल अधिकारी विजय ढेरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, यशस्वी उद्योजक सर्वश्री सुरेश माळी, महेश गाढवे, नमन पाटील, गिरधर पाटील आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना कृषि विभागाकडील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबद्दल कृषि उपसंचालक धनाजी पाटील यांनी माहिती दिली. उद्योग भवनचे प्रकल्पाधिकारी किरण बनसोडे, प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ माळी यांनी बेकरी प्रॉडक्ट, दुग्ध पदार्थ बाबत ब्रॅडिंग/ पॅकेजिंग/ मार्केटिंग बाबत विविध योजनांची माहिती दिली. तसेच जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी बँक ऑफ इंडिया कडील लघु उद्योग व्यवसाय, शेती उत्पादन प्रक्रिया याकामी अर्थ सहाय्य व अनुदान उपलब्धतेबाबत मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यात उत्पादित होणारी प्रमुख पिके ऊस, डाळिंब द्राक्षे, हळद, केळी, शेवगा इत्यादी शेतीमालावर प्रक्रिया करणे, पॅकेजिंग/ मार्केटिंग इत्यादी बाबत प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनानुसार देण्यात आलेल्या या प्रशिक्षणास 70 हून अधिक एन.एस.एस. विद्यार्थी उपस्थित होते.

 

00000

संबंधित पोस्ट

वादग्रस्त भोंदूबाबा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा.

रासायनिक खतांमुळे आरोग्याला धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

आज वेव्हज् परिषदेच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 1 मे रोजी मुंबईत

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१’ चे आयोजन

⛈️ रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा

अमडापूर येथे 8 मार्च रोजी विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा