vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वाधार’ योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ

‘स्वाधार’ योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ

      अमरावती, प्रतिनिधी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रांतील त्रुटींमुळे कार्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 30 मार्चपर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

  राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट आर्थिक मदत देण्यासाठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ सुरू केली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, त्यांच्यापैकी काही अर्ज कागदपत्रांतील कमतरतेमुळे कार्यालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे. कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देऊनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाही, ज्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

     विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रे कार्यालयात संबंधित शाखेकडे जमा करावीत. या मुदतीत त्रुटी पूर्ण केली नसल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची राहील. तसेच दि. 23 ते 30 मार्च 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 यावेळेत स्वत: उपस्थित राहून त्रुटी पूर्तता करून घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय किंवा दुरध्वनी क्र. ०७२१-२६६१२६१ वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

महिला तक्रार निवारण समितीच्या रिक्त पदांसाठी अमरावतीजिल्हा प्रशासनाकडून अर्ज आमंत्रित  15 मार्चपर्यंत मुदत

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग,  शेतमजूर,, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू,अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक*दिवसातून दोनवेळा करणार आरोग्य तपासणी…

टाईमलाईन’ समाजात सकारात्मकता पेरणारे पुस्तक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या ‘टाईमलाईन’ पुस्तकाचे प्रकाशन

जूट क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेजूट मार्क इंडिया’ योजनेंतर्गत जनजागृती कार्यशाळा संपन्न

नवलारी गडचिरोली: महिला सक्षमीकरणाचा ‘गड’