vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंब्रा रेल्वे लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाचा सर्वात मोठा निर्णय; यापुढे मोटरमनवर…

मुंब्रा रेल्वे लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाचा सर्वात मोठा निर्णय; यापुढे मोटरमनवर…

मुंबई प्रतिनिधी

कसारा-सीएसएमटी आणि सीएसएमटी-कर्जत जलद लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू आणि नऊ जण जखमी झाले. या मुंब्रा अपघाताच्या चौकशीत ठोस निष्कर्ष अद्याप हाती आलेला नाही. याप्रकरणी मध्य रेल्वेने नियुक्त केलेल्या उच्च स्तरीय समितीला मिळालेला प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प ठरला असून, मिळालेल्या माहितीतून अपघाताचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. दिवा व मुंब्रा स्थानकादरम्यान 9 जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेची दाखल अगदी न्यायालयानेही घेतलेली असतानाच आता रेल्वेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नेमका काय निर्णय घेतलाय रेल्वेने?लोकलमध्ये सुरक्षितता वाढविण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आता मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम सुरू केले आहे. सध्या मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्या आहेत. आणखी 15 लोकलसाठी 30 यंत्रणा ऑर्डर करण्यात आल्या आहेत. एका लोकलमधील दोन मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी अंदाजे सव्वा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेच्या 26 लोकलमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. या निर्णयामुळे यापुढे मोटरमनवर सतत सीसीटीव्हीचं लक्ष राहणार आहे.

याचा काय फायदा होणार?मुंबई लोकलने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांचे ट्रेनमधून पडून किंवा रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू होतात. अनेकदा अपघातांचे कारण स्पष्ट होत नसल्याने रेल्वे प्रशासनाला याची कारणे शोधता येत नाहीत. तसेच प्रवाशांना नुकसानभरपाई देताना रेल्वेला त्यांची बाजू कोर्टामध्ये स्पष्टपणे मांडता येत नाही. आता या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास मदत मिळू शकेल. यामध्ये अपघातादरम्यान बाह्य बाबींचा समावेश आहे का? प्रवाशांची चूक आहे का? अपघातावेळी मोटरमनचे लक्ष कुठे होते? त्याने सर्व सूचनांचे पालन करतानाच सर्व सिग्नल पाळले आहेत का? अशा अनेक बाबी तपासणे शक्य होईल.

अपघात झाल्यास मोटरमनची कृती, त्याचा प्रतिसाद हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमधून तपासले जाऊ शकते. मोटरमनवर असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीची नोंद ठेवता येते. त्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य धोरण ठरवण्यास या कॅमेरांची मदत होणार आहे.

मुंब्रा अपघातासारख्या घटना घडल्यास…मध्य रेल्वेच्या मोटरमनचा या यंत्रणेला विरोध होता. मात्र मुंब्रा अपघातानंतर हे काम रेल्वेने फास्ट ट्रॅकवर आणले आहे. मुंब्रा अपघाताचे कारण स्पष्ट होत नसल्याने यापुढे अशा घटना घडल्यास मोटरमन कॅबिनमधील सीसीटीव्ही फुटेजचा तपासात मदत होईल.

संबंधित पोस्ट

जालना गणेश फेस्टीवलमध्ये मान्यवरांच्या हस्ते सभा मंडप पूजन-अशोकराव आगलावे

स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व हरित कुंभसाठी सर्वांचे योगदान आवश्यक : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध विकास कामांचे भूमीपूजन

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम…

vishwatmaklokswamivarta

किसान क्रेडिट कार्डधारकांना राज्य शासनाकडून ४ टक्के व्याज सवलत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यास यश

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील लालबागचा राजाचा 2025 विसर्जन सोहळा थेट प्रक्षेपण पहा “विश्वात्मक लोकस्वामीवार्ता” वेब पोर्टलवर-:-https://vishwatmaklokswamivarta.com/ या घ्या गणपती बाप्पाचे दर्शन गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या….

vishwatmaklokswamivarta