vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवासी शाळांतील विद्यार्थ्यांच्या विभागीय  स्नेहसंमेलनाचा उत्साहात शुभारंभ  

निवासी शाळांतील विद्यार्थ्यांच्या विभागीय  स्नेहसंमेलनाचा उत्साहात शुभारंभ

 

अकोला, प्रतिनिधी : सामाजिक न्याय विभागातर्फे शासकीय निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांचे विभागीय स्नेहसंमेलन, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहात जिल्हा क्रीडा संकुल येथे आज झाला.

समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांच्या हस्ते पथसंचलनाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी अमरावती विभागातील सहाय्यक आयुक्त मारुती वाठ, श्रीमती मंगला मून, श्री. मेरथ,श्री.चव्हाण, श्रीमती बोबडे आदी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा संकुल येथे होत असलेल्या या विभागीय स्नेहसंमेलनात अमरावती विभागातून पाचही जिल्ह्यांतील २६ निवासी शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच क्रीडा स्पर्धांमध्ये सांघिक व वैयक्तिक मैदानी खेळांचा समावेश आहे. निवासी शाळांतील कला, क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी हा महोत्सव आयोजिण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संमेलन उपयुक्त ठरेल, असे मनोगत विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

०००

संबंधित पोस्ट

करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा

एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल

महाज्योती’च्या संशोधकाचा-‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास,स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन,माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध…

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाज कल्याण विभागाची विशेष कार्यशाळा;10 मे पर्यंत अंतिम मुदत

बॉलीवूड अभिनेता सलमान खान झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (एसआरए) कार्यालयास सदिच्छा भेट यांच्या हस्ते पात्र झोपडपट्टी वासियांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्यांचे वितरण 

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन*